आंबा पिकासाठी संशोधनाची गरज

कॅनिगचा दर, अनुदान रॉकेल आणि वानराच्या त्रासापासून मुक्तता हे विषय सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याची तीव्र नाराजी रत्नागिरीत आयोजित आंबा उत्पादक संघाच्या चर्चासत्रामध्ये बागायतदारांनी व्यक्त केली.
आंबा पिकासाठी संशोधनाची गरज Research needed for mango crop
आंबा पिकासाठी संशोधनाची गरज Research needed for mango crop

रत्नागिरी : कीटकनाशक कंपन्यांवर शासनाचे नियंत्रण नसल्यामुळे भरमसाट किमतीची कीटकनाशके आंबा बागायतदारांना विकत घ्यावी लागतात. खर्च वाढतो, पण तुलनेत त्याचा फायदा होत नाही. यासह कॅनिगचा दर, अनुदान रॉकेल आणि वानराच्या त्रासापासून मुक्तता हे विषय सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याची तीव्र नाराजी रत्नागिरीत आयोजित आंबा उत्पादक संघाच्या चर्चासत्रामध्ये बागायतदारांनी व्यक्त केली. त्यासाठी एकजूट होऊन प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी करण्याबाबत ठाम मत व्यक्त केले. टीआरपी येथील अंबर मंगल कार्यालयात रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्थेची वार्षिक सभा आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंबा बागायतदार काका मुळे, संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत, तुकाराम घवाळी, बावा साळवी, सतीश शेवडे, मंगेश साळवी यांनी मते मांडली. कीटकनाशक औषधांवर यावेळी सर्वच बागायतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दुकानात उदारीवर कीटकनाशक घ्यायला गेल्यास ते औषध २ हजार २०० रुपये लिटरने मिळते. रोखीने व्यवहार केल्यास १ हजार ६००रुपये लिटरला मिळते. तेच कंपनीकडून थेट मागवल्यास ९०० रुपये लिटरला घेतले जातात. यामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. कीटकनाशक कंपन्या आणि विक्री करणारे यांच्यावर सरकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे बागायतदारांच्या खर्चात वाढ झालेली आहे. तो करूनही त्याचा परिणाम कीटकांवर होत नाही, ते वेगळेच. कीटकनाशकातील कंटेन्ट तपासणी करणारी यंत्रणाच प्रभावशाली नाही. त्यामुळे दर्जाहीन कीटकनाशके फवारून झाडांचेही नुकसान होत आहे. जी कीटकनाशके उपयुक्त ठरली होती, ती गेल्या दोन ते चार वर्षांत शासनाकडून बंदी घालण्यात आली आहेत. याकडे शासनाकडून गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. त्यासाठी आंबा उत्पादक संघाच्या छत्राखाली सर्व बागायतदारांनी एकवटले पाहिजे, असे बागायतदार काकासाहेब मुळे यांनी सांगितले. सध्या वापरात असलेली कीटकनाशके आंबा पिकावर संशोधन करून निर्माण केलेली नाहीत. कृषी विद्यापीठांकडून याची गंभीर दखल घेतली पाहिजे. जेणेकरून आंब्यावर निर्माण होणाऱ्या कीटकांवर प्रभावशाली औषधांची निर्मिती करता येईल, अशी सूचना बागायतदार मंगेश साळवी यांनी केली.  आंबा फळबाग शेती झाली खर्चिक गेल्या पंधरा वर्षांत आंबा प्रगती थांबली आहे. ही शेती करणे फारच खर्चिक झाली आहे. मूळ प्रश्‍नच सुटलेले नाहीत. तीन नंबरचा आंबा कॅनिंगला पाठवला जातो. याचा दर अवघा १० ते १२ रुपये एवढाच मिळतो. फवारणीसाठी वापरण्यात येणारे पंप प्रामुख्याने रॉकेलवर चालतात. रॉकेलचा दर लिटरला २० ते २५ रुपये आहे. रॉकेल मिळत नसल्याने ९० रुपये लिटर दर असलेले पेट्रोल वापरावे लागते. मोठ्या बागायतदारांकडे १० पंप असल्यास फवारणीचा खर्चच अमाप येतो. कोकणात वानरही मोठ्या प्रमाणात आहेत. आबा शेती खर्चिक झाल्याचे शेतकरी म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com