साताऱ्यात बाजार समित्यांच्या बंदला प्रतिसाद

सातारा : केंद्र शासनाने ५ जून २०२० रोजी काढलेल्या अध्यादेशाच्या विरोधात शुक्रवारी सातारा जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद राहिल्या. या एकदिवशीय संपाला मोठा प्रतिसाद मिळाला.
 Response to the closure of market committees in Satara

केंद्र शासनाने ५ जून रोजी अध्यादेश काढून बाजार समितीच्या बंदिस्त बाजार आवाराबाहेर धान्य, कडधान्य, तेलबिया या इतर शेतमाल नियमन मुक्त केलेला आहे. केंद्राच्या या अध्यादेशामुळे बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम होऊन बाजार समिती कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल.

या अध्यादेशाला विरोध करण्यासाठी व बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासकिय सेवेत घ्यावे, या मागण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांनी बंद पाळत एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता.  शुक्रवारी सर्व बाजार समित्यांनी बंद पाळल्याने सर्व व्यवहार बंद राहिले.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com