परतीच्या पावसाचा भात पिकाला मोठा फटका

परतीच्या पावसाने पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे सर्वाधिक फटका भात पिकांना बसला आहे.
The return rains hit the paddy crop hard
The return rains hit the paddy crop hard

पुणे ः परतीच्या पावसाने पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे सर्वाधिक फटका भात पिकांना बसला आहे. त्यापाठोपाठ सोयाबीन, बाजरी, ऊस, कांदा, द्राक्षे, डाळिंब व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस कोसळत आहे. दिवसभर ढगाळ हवामानासह अधूनमधून ऊन पडत आहे. दुपारनंतर अचानक काळेकुट्ट ढग भरून येऊन वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. मंगळवारी दिवसभर ढगांनी पांघरून घातले होते. सायंकाळी जिल्ह्यातील विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. रात्री अकरा दरम्यान पुणे शहरासह अनेक भागात पाऊस पडला. जिल्ह्याच्या पश्चिम पट्यात वाढीच्या व निसवण्याच्या अवस्थेत असलेल्या भात पिकांचे पावसामुळे आडवी झाली आहेत. तर काही ठिकाणी भात शेतीत पाणी साचल्याने नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नुकसान भरपाई देण्याची मागणी पुढे येत आहे.  

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोथरूड, खडकवासला, थेऊर, उरूळी कांचन, भोसरी, चिंचवड, कळस, वाघोली परिसरात हलक्या सरी पडल्या. भोरमधील आंबवडे, संगमनेर, मावळमधील वडगाव मावळ, तळेगाव, कार्ला, लोणावळा, शिवणे, वेल्ह्यातील विंझर, जुन्नरमधील नारायणगाव, वडगाव आनंद, आपटाळे, ओतूर, खेडमधील राजगुरूनगर, कुडे, पाईट, चाकण, पिंपळगाव, कन्हेरसर, कडूस येथेही पावसाचा शिडकावा झाला. आंबेगावमधील घोडेगाव, आंबेगाव, पारगाव, मंचर, शिरूरमधील न्हावरा, मलठण, तळेगाव, रांजणगाव, पाबळ, शिरूर, बारामतीमधील पणदरे, वडगाव, उंडवडी दौंडमधील देऊळगाव, पाटस, यवत, कडेगाव, राहू,  रावणगाव, दौंड, पुरंदरमधील सासवड, भिवंडी, जेजुरी या भागात पावसाच्या बऱ्यापैकी सरी कोसळल्या आहेत.

मंगळवारी (ता. १३) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये, स्रोत- कृषीविभाग ः हवेली - खेड १६, हडपसर १०.५, मुळशी - पौड २२.५, घोटावडे २०.०, थेरगाव १७.१, माले १७.१, पिरंगूट १७.३, भोर - भोर १९.०, नसरापूर २४.५, किकवी २६.०, मावळ - काले ११.८, खडकाळा २०.३, वेल्हा - वेल्हा १६.३, पाणशेत १६.३, अंबावणे २८.८, खेड -  वाडा २१.५, आळंदी १६.३, शिरूर - वडगाव १३.३, बारामती - बारामती १९.३, माळेगाव ११.७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com