
पुणे : ‘‘महाराष्ट्र (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या पुणे जिल्ह्यातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद मार्चपर्यंत खर्ची करा,’’ असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच दिले आहेत. यामुळे रिंग रोडच्या भूसंपादनास गती मिळणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या रिंग रोडचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले आहे. या रिंग रोडचे पूर्व व पश्चिम असे दोन टप्पे आहेत. पश्चिम रिंग रोडला केळवडेपासून सुरुवात होणार असून हवेली, मुळशी आणि मावळ येथील उर्से टोलनाका येथे एकत्र येणार आहे. भूसंपादनासाठी रिंगरोडच्या पश्चिम भागातील मार्गिकेच्या मोजणी कामाला २१ एप्रिल २०२१ रोजी सुरुवात करण्यात आली. एकूण ३७ गावांमधून हा रिंग रोड जाणार आहे. त्यापैकी ३५ गावांतील मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. रिंगरोडसाठी ६९५ हेक्टर जमिनींचे संपादन करण्यात येणार आहे. आतापर्यंत ३५ गावांतील ६५० हेक्टरहून अधिक जमिनींच्या मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित दोन गावांच्या मोजणीचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे या महिन्या अखेरपर्यंत पश्चिम भागातील रिंग रोडच्या मोजणीचे काम जवळपास शंभर टक्के पूर्ण होणार आहे. दरम्यान, भूसंपादन सुरू करण्याबाबतचे आदेश आठ दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव सदाशिव साळुंखे यांनी काढले होते. त्या आदेशानुसार कोणत्या गावातील किती क्षेत्र या रिंगरोडमध्ये जाणार आहे, याची माहितीदेखील देण्यात आली आहे. पवार यांच्या उपस्थितीत नुकतीच मुंबई येथे प्रकल्प अंमलबाजवणी कमिटीची बैठक झाली. या बैठकीत एमएसआरडीसी रिंग रोडच्या कामकाजाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
- रिंग रोडचे पूर्व व पश्चिम असे दोन टप्पे - एकूण ३७ गावांमधून रिंग रोड जाणार. - त्यापैकी ३५ गावांतील मोजणीचे काम पूर्ण. -रिंग रोडसाठी ६९५ हेक्टर जमिनींचे संपादन करण्यात येणार. - ३५ गावांतील ६५० हेक्टरहून अधिक जमिनींच्या मोजणीचे काम पूर्ण.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.