परभणी जिल्ह्यात ‘रोहयो’ची १ हजार ७२० कामे सुरू

परभणी ः जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत १७२० कामे सुरू आहेत. त्यावर १६ हजार ९७ मजुरांची उपस्थिती आहे. चालू आर्थिक वर्षात आजवर ४७ कोटी १५ लाख ६७ हजार रुपये खर्च झाला. तर ५ कोटी ७० लाखांची देयके देय आहेत.
परभणी जिल्ह्यात ‘रोहयो’ची  १ हजार ७२० कामे सुरू
Rohyo in Parbhani district 1 thousand 720 works started

परभणी ः जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत १७२० कामे सुरू आहेत. त्यावर १६ हजार ९७ मजुरांची उपस्थिती आहे. चालू आर्थिक वर्षात आजवर ४७ कोटी १५ लाख ६७ हजार रुपये खर्च झाला. तर ५ कोटी ७० लाखांची देयके देय आहेत.

जिल्ह्यातील ग्रामपंचायती अंतर्गत घरकुलांची ११२ कामे, सार्वजनिक विहिरींची १९ कामे, वैयक्तिक विहिरींची ४३२ कामे, सार्वजनिक वृक्ष लागवडीची ६७ कामे, वैयक्तिक वृक्ष लागवडीची ६१४ कामे, रस्त्यांची २४ कामे अशी एकूण १ हजार २६८ कामे सुरू आहेत. वन विभागांतर्गत रोपवाटिकेची ८ कामे, सामाजिक वनीकरण अंतर्गत रोपवाटिकेची ६ कामे, वृक्ष लागवडीची २८३ कामे, वैयक्तिक वृक्ष लागवडीची ८० कामे सुरु आहेत.

रेशीम विभागांतर्गत ७४ कामे ,तर इतर यंत्रणांची एकूण ४५१ कामे सुरू आहेत. परभणी तालुक्यातील १२३ कामांवर १ हजार १७९ मजूर उपस्थित आहेत. जिंतूर तालुक्यातील २०६ कामांवर २ हजार १४८ मजूर उपस्थिती आहे. सेलू तालुक्यातील २७७ कामांवर ३ हजार ७२३ मजूर, पाथरी तालुक्यातील ८७ कामांवर ६१३ मजूर उपस्थिती आहे. सोनपेठ तालुक्यातील ६८ कामांवर ४६७ मजूर, गंगाखेड तालुक्यातील ७५ कामांवर ७०५ मजूर, पालम तालुक्यातील ३४ कामांवर ४५३ मजूर आणि पूर्णा तालुक्यातील ४६१ कामांवर  ४ हजार ११७ मजूर उपस्थिती आहे.

आजवर अकुशल मजुरीवर ३२ कोटी ८२ लाख ३८ हजार रुपये, अर्ध कुशल व कुशल मजुरीवर ४४ लाख २४ हजार रुपये खर्च झाला आहे. साहित्यावर ११ कोटी ३ लाख ८३ हजार रुपये खर्च झाला आहे. प्रशासकीय खर्चासह एकूण ४७ कोटी १५ लाख ६७ हजार रुपये खर्च झाला. अकुशल कामाची १ कोटी ६१ लाख १ हजार रुपये आणि साहित्याचे ४ कोटी ९ लाख मिळून एकूण ५ कोटी ७० लाख रुपयाची देयके देय आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.