केसर आंबा निर्यातीस मोठी संधी ः डॉ. कापसे

औरंगाबाद : ‘‘या वर्षी देशांतून आंबा निर्यात खुली झाली. त्यामुळे केसर आंब्याला निर्यातीसाठी फार मोठा वाव आहे,’’ असे मत आंबा तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी व्यक्त केले. त्यासाठी शेतकऱ्यांनी शासनाच्या मँगोनेटमध्ये नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
केसर आंबा निर्यातीस  मोठी संधी ः डॉ. कापसे
Saffron Mango Export Big opportunity: Dr. Kapse

औरंगाबाद : ‘‘या वर्षी देशांतून आंबा निर्यात खुली झाली. त्यामुळे केसर आंब्याला निर्यातीसाठी फार मोठा वाव आहे,’’ असे मत आंबा तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी व्यक्त केले. त्यासाठी शेतकऱ्यांनी शासनाच्या मँगोनेटमध्ये नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

महा केसर आंबा बागायतदार संघ महाएफपीओ फेडरेशन आणि जनजागृती प्रतिष्ठानतर्फे ‘निर्यात योग्य केसर आंबा उत्पादनाविषयी’ वेबिनार घेण्यात आला. डॉ. कापसे यांनी आंब्यामध्ये आता करावयाच्या कामाविषयी अतिशय तांत्रिक, असे मार्गदर्शन केले.

डॉ. कापसे म्हणाले, ‘‘सध्या आंबा बागांत मोहरापासून ते फळे गावठी बोराच्या आकाराची झाली आहेत. ढगाळ वातावरण तसेच कडाक्‍याची थंडी पडत आहे. त्यामुळे मोहर तसेच लहान फळांचे संरक्षण करण्यासाठी भुरी रोग आणि तुडतुडे नियंत्रण आवश्यक आहे. त्यासाठी ८० टक्के पाणीमिश्रित गंधक किंवा बाविस्टीन आणि मोनोसिल किंवा इमिडाक्लोप्रिड यांच्या १५ दिवसांच्या अंतराने तीन ते चार फवारण्या कराव्यात. प्रत्येक फवारणीमध्ये रोगनाशक आणि कीडनाशक बदलत जावे. फेब्रुवारी-मार्चमध्ये उन्हामुळे तापमान ३५ डिग्रीच्या पुढे गेल्यास बागेस एक ते दोन पाणी पाटाने द्यावे, जेणेकरून फळगळ नियंत्रणात राहून फळांचा आकार वाढण्यास मदत होईल. फळांचा आकार व वजन वाढीसाठी वेळोवेळी १२ :६१:० तसेच १३:०:४५ च्या वेळोवेळी फवारण्या घ्याव्यात.’’ 

‘‘पाऊस जास्त झाल्यामुळे बागेत आर्द्रता जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी मार्च-एप्रिलपासूनच कामगंध सापळे प्रति एकर आठ ते नऊ बागेत लावावेत. आता फेब्रुवारीमध्ये थंडी कमी झाल्यास इंसितू पद्धतीने लागवड केलेल्या बागेत राहिलेले कलमीकरण करून घ्यावे. नवीन बागेमध्ये झाडाला आकार देण्यासाठीची छाटणी घ्यावी,’’ असेही डॉ. कापसे म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.