सानेन शेळीचे राज्यात पैदास केंद्र उभारणार : सुनील केदार

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी शेळी व मेंढी पालन व्यवसायास चालना देणे आवश्यक आहे, यासाठी जगात जास्त दूध देणाऱ्या सानेन बकरीचे पैदास केंद्र महाराष्ट्रात उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
sunil kedar
sunil kedar

सोलापूर ः शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी शेळी व मेंढी पालन व्यवसायास चालना देणे आवश्यक आहे, यासाठी जगात जास्त दूध देणाऱ्या सानेन बकरीचे पैदास केंद्र महाराष्ट्रात उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी सांगितले. 

महुद (ता. सांगोला) येथील पुण्यश्‍लोक अहल्यादेवी शेळी व मेंढी विकास प्रक्षेत्राला भेट देण्यासाठी मंत्री केदार येथे आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एन. ए. सोनवणे, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. एस. बोरकर, पुण्यश्‍लोक अहल्यादेवी शेळी व मेंढी विकास प्रक्षेत्राचे संचालक डॉ. शशांक कांबळे, सहायक आयुक्त डॉ. एस. एस. भिंगारे तसेच परिसरातील शेळी, मेंढीपालक उपस्थित होते. 

श्री. केदार म्हणाले, की शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचाविण्यासाठी उच्च प्रतीच्या शेळ्या व मेंढ्याची पैदास करून देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. पशुधन निरोगी राहावे, आजारी पशुधनाला जागेवरच उपचार मिळावेत यासाठी वैद्यकीय पथकासह फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू करण्यात आले असल्याने शेतकऱ्यांना पशुधनावरील उपचाराची सुविधा दारातच मिळणार आहे. मेंढीच्या माडग्याळ जातीचे वजन लवकर वाढत असल्याने या जातीचे पैदास केंद्र उभारण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. विमा काढलेल्या पशुधनाच्या नुकसानभरपाई तत्काळ मिळेल, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही पशुसंवर्धनमंत्री केदार यांनी या वेळी दिल्या. 

पुण्यश्‍लोक अहल्यादेवी शेळी व मेंढी विकास प्रक्षेत्राचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. कांबळे यांनी प्रकल्पातील शेळी, मेंढीपालन, वैद्यकीय सुविधा, चारा आदी सुविधेबाबत माहिती दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com