सांगलीत पीक कर्जवाटपात बॅंकांचा हात आखडताच

सांगली ः रब्बी हंगामातील पिकांची पेरणी अंतिम झाली आहे. तरीही शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांसाठी कर्ज वाटप करण्यात बॅंकेचा हात अखडताच असल्याचे चित्र आहे.
सांगलीत पीक कर्जवाटपात बॅंकांचा हात आखडताच
Sangli crop loan disbursement As soon as the banks get out of hand

सांगली ः रब्बी हंगामातील पिकांची पेरणी अंतिम झाली आहे. तरीही शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांसाठी कर्ज वाटप करण्यात बॅंकेचा हात अखडताच असल्याचे चित्र आहे. जिल्हा बॅंक, राष्ट्रीयीकृत व व्यापारी बॅंकांनी १९१ कोटी १० लाख म्हणजे २४ टक्के इतकेच कर्जवाटप केले आहे. जिल्हा बॅंक देखील कर्ज वितरण करण्यास पिछाडीवर असल्याचे चित्र आहे.

शासनाने रब्बी हंगामात जिल्हा बॅंक, राष्ट्रीयीकृत आणि ग्रामीण बॅंकाना ८१० कोटी रुपयांच्या पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी जिल्हा बॅंकेला ४३५ कोटी, तर राष्ट्रीयीकृत, व्यापारी व ग्रामीण बॅंकाना ३७५ कोटी असे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांना कर्ज पुरवठा करण्यास गेल्या दोन महिन्यांपासून सुरुवात झाली आहे.

दरवर्षी राष्ट्रीयीकृत, व्यापारी व ग्रामीण बॅंका पीक वाटपास मागे असतात. मात्र, यंदाच्या हंगामात या बॅंकांनी कर्ज वाटप करण्यास आघाडी घेतली आहे. राष्ट्रीयकृत, व्यापारी व ग्रामीण बॅंकांनी १३९ कोटी ६६ लाखाचे कर्जाचे वितरण केले आहे.

दरम्यान, यंदा जिल्हा बॅंक कर्जवाटपात मागे असल्याचे चित्र आहे. डिसेंबर महिन्यात जिल्हा बॅंकेने ३० कोटीचे कर्ज वाटप केले होते. एका महिन्यात अवघे २१ कोटीचे कर्जवाटप केले. आतापर्यंत ५१ कोटी ४४ लाखाचे कर्ज वितरण केले आहे. रब्बी हंगामातील पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. तरीही बॅंकांनी पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही. 

पीक कर्ज वेळेत मिळाले, तर शेतकऱ्यांना फायदा होईल. परंतु, त्याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.