सांगली बाजार समितीला पुन्हा मिळाली मुदतवाढ

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसह सात बाजार समित्यांच्या विद्यमान संचालक मंडळाला पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
सांगली बाजार समितीला  पुन्हा मिळाली मुदतवाढ
Sangli Market Committee Received extension

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसह सात बाजार समित्यांच्या विद्यमान संचालक मंडळाला पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. २३ एप्रिलपर्यंत ही मुदतवाढ असणार आहे. शासनाच्या या निर्णयाने संचालकांना चौथ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे. मुदतवाढ मिळाली असली तरी संचालकांना धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत.

सांगली बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत २६ ऑगस्ट २०२० रोजी संपुष्टात आली होती. मात्र, कोरोनामुळे वेळोवेळी मुदतवाढ दिली. २७ फेब्रुवारी २१ पासून पुढील सहा महिने म्हणजेच २६ ऑगष्ट २०२१ आणि त्यानंतर २३ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. सांगली बाजार समितीसह तासगाव, आटपाडी, विटा, पलूस, वाळवा आणि शिराळा बाजार समित्यांचा समावेश आहे. सर्वच बाजार समितींची मुदत संपली आहे. परंतु, कोरोनाच्या लाटेमुळे मुदतवाढ देण्यात आली.

कोरोना लाट ओसरल्यानंतर शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणूका घेण्यास हिरवा कंदील दाखविला. सहा टप्प्यात निवडणूका होत आहेत. गेल्या चार महिन्यापासून सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. मात्र, बाजार समितीसाठी सोसायट्यांचे मतदार आहेत. त्यामुळे निवडणुकीस पात्र असलेल्या जिल्ह्यातील सर्व सोसायट्यांची निवडणूक झाल्याशिवाय बाजार समितीची निवडणूक घेता येणार नाही. 

चौथ्यांदा मुदतवाढीची लॉटरी

विद्यमान संचालक मंडळाला देण्यात आलेली मुदत रविवारी (ता. २३) संपली.  तोच शासनाने विद्यमान संचालक मंडळाला आणखी तीन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. २३ एप्रिलपर्यंत ही मुदतवाढ असेल. या निर्णयाने विद्यमान संचालकांना चौथ्यांदा मुदतवाढीची लॉटरी लागली आहे. मुदतवाढ मिळाली असली तरी संचालकांना धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com