सरकारकडून तिसऱ्या लाटेचा बाऊ ः चंद्रकांत पाटील

जनता कंटाळून रस्त्यावर उतरण्याआधीच सरकारने सुधारून जायला हवे. कारण राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर झाला आहे, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
To scare too much of the third wave from the government: Chandrakant Patil
To scare too much of the third wave from the government: Chandrakant Patil

नागपूर : राज्य सरकार स्वतःचे अपयश लपविण्यासाठी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती दाखवत आहे. पण असे न करता आता संपूर्ण जनजीवन सुरळीत केले पाहिजे. जनता कंटाळून रस्त्यावर उतरण्याआधीच सरकारने सुधारून जायला हवे. कारण राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर झाला आहे, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. 

चंद्रकांत पाटील सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी (ता. ३१) त्यांचे नागपुरात आगमन झाले. सकाळी काही कार्यक्रम आटोपून ते आमदार गिरीष व्यास यांच्या घरी आले असताना माध्यमांशी बोलत होते. 

पाटील म्हणाले, की महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी चौकशीत सहकार्य करायला हवे. परिवहन मंत्री अनिल परब कितीही व्यस्त असले, तरी त्यांनी ईडीकडे चौकशीला जायला हवं होतं. आधी वनमंत्री संजय राठोड गेले, मग गृहमंत्री अनिल देशमुख आणि आता परिवहन मंत्री अनिल परब यांचा नंबर आहे. राज्य सरकारमधील अशा मंत्र्यांची यादी मोठी आहे. लागेल आता एकेकाचा नंबर! हे मंत्री कोण लागून गेले? सर्वसामान्य माणसाला लागलीच अटक होते. मग राठोड, व्यास, परब हे कोण लागून गेले. त्यांनी ईडीकडे चौकशीला जायला हवं होतं. अनिल देशमुखांचंही असंच चाललंय आणि परबही त्यांचाच कित्ता गिरवत आहेत. त्यांनी कितीही बहाणे केले तरी, सक्तवसुली संचालनालय त्यांची चौकशी करणारच आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com