कौशल्याधारित शिक्षण घेतल्यास महिलांची प्रगती ः शौमिका महाडिक

कौशल्याधारित शिक्षण घेतल्यास महिलांची उन्नती ः शौमिका महाडिक
कौशल्याधारित शिक्षण घेतल्यास महिलांची उन्नती ः शौमिका महाडिक

कोल्हापूर : महिलांबरोबर नव्या पिढीतील मुलींना कौशल्य आधारित शिक्षण घेतल्यास त्या अधिक सक्षम बनू शकतील. यामुळे नवी संधी मिळेल. त्या अधिक स्वयंपूर्ण होतील, असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी येथे केले. 

जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित ताराराणी महोत्सवाचे उदघाटन रविवारी (ता. ६) झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रायव्हेट हायस्कूल मैदान येथे हे प्रदर्शन सुरू आहे. विविध बचतगटांना प्रोत्साहन देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ तारखेअखेर हे प्रदर्शन चालेल. महापौर सौ. सरिता मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

महाडिक म्हणाल्या, महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलांसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनातून लाभ घेऊन त्यांनी नव्या उद्योगाची उभारणी करावी, स्वत:मधील क्षमता कौशल्य ओळखून तो उद्योग विकसित करावा. चांगल्या झाडांत रुपांतर होण्यासाठी बियाणाला मातीत अगोदर रुजावे लागते. त्याच पद्धतीने ताराराणी महोत्सव महिलांसाठी या मातीचे काम करीत आहे. 

कृष्णावेणी स्वयंसाह्यता समूह, दत्तवाड (ता. शिरोळ), श्री महालक्ष्मी स्वयंसाह्यता समूह, (मालवे, ता. राधानगरी) ज्वालामालिनी स्वयंसाह्यता समूह, राशिवडे (ता. राधानगरी) यासह तालुका स्तरावरील छत्तीस बचत गटांना पुरस्काराने गौरविण्यात आले. गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्हा परिषदेला राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकाने गौरविण्यात आले. यासाठी कष्ट घेतलेल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यातील गटविकास अधिकारी, पंचायत समिती सभापती यांचा सत्कार झाला. 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महिला व बालविकास सभापती शुभांगी मगदूम, जिल्हा परिषेदेचे सदस्य अरुण इंगवले, बंडा माने, हेमंत कोल्हेकर, श्रीमती पाटील,बॅंक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर नितीन देशपांडे, अग्रणी बॅंक व्यवस्थापक राहूल माने, नाबार्डचे सहाय्यक प्रबंधक नंदू नाईक, बंडा माने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, स्टेट बुॅंकेचे जिल्हा समन्वयक निलेश सोनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.बी. भालेराव, रवींद्र आडसुळ, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी आशा उबाळे, कार्यकारी अभियंता तुषार बुरुड, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सचिन पानारी, सम्राट पोतदार, राजेंद्र जाधव आदि उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com