आर्थिक दुर्बल घटकांना बियाणे वाटपाचे नियोजन ः भुसे

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत विविध बियाण्यांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात येत आहे. आर्थिक दुर्बल घटकांसह मागासवर्गीय, विधवा, कोरोनाग्रस्तामुळे बाधित झालेल्या कुटुंबासह आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मोफत बियाणे वाटप करण्याचे नियोजन केले आहे.
Seed distribution planning to economically weaker sections: Straw
Seed distribution planning to economically weaker sections: Straw

नाशिक : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत विविध बियाण्यांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात येत आहे. आर्थिक दुर्बल घटकांसह मागासवर्गीय, विधवा, कोरोनाग्रस्तामुळे बाधित झालेल्या कुटुंबासह आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मोफत बियाणे वाटप करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी बियाणे वितरण करणाऱ्या कंपन्यांनी सीएसआर निधीतून सामाजिक बांधिलकी जपत बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभाग सक्षम असल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. 

श्री. भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (ता. १२) तालुक्यातील आर्थिक दुर्बल घटकांसह गरजू शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तंत्रअधिकारी गोकुळ अहिरे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी संबंधित गावचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

यावेळी श्री. भुसे म्हणाले, खरीप हंगामात पेरण्या वेळेवर होण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. राज्यात बियाण्यासह रासायनिक खतांची कमतरता भासणार नाही. यंदा युरियासारख्या खताचा ७५ हजार टन बफर स्टॉक करण्यात आला आहे. जैविक बीजप्रक्रिया करून उत्पन्नवाढीवर भर देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. बियाणे कंपन्यांमार्फत सामाजिक बांधिलकी जपत शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात दिल्यामुळे बियाणे कंपन्यांचे त्यांनी यावेळी आभार मानले.

कृषी विभागामार्फत चालू खरीप हंगामात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांसाठी बाजरी-४० प्रकल्प, मका-३०, तूर-२, मूग-५, उडीद-१ तर सोयाबीनचे-२ प्रकल्प अधिक उत्पन्नवाढीसाठी घेण्यात आले आहेत.प्रत्येक प्रकल्पामध्ये २५ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना देखील बियाणे वाटपाचे नियोजन करण्यात आले. प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना बियाण्याबरोबरच बीजप्रक्रिया, रासायनिक खतांचा वापर, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि पणन व्यवस्था यांचेही नियोजन करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी व्यवहारे यांनी दिली. तंत्रअधिकारी अहिरे म्हणाले, की तंत्रज्ञानाची सखोल माहिती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com