परभणी विभागात उन्हाळी हंगामात सोयाबीनचे ६ हजार ९९६ हेक्टरवर बीजोत्पादन

परभणी ः ‘महाबीज’च्या परभणी विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये सुधारित नियोजनानुसार येत्या (२०२२) उन्हाळी हंगामात सोयाबीनचा ६ हजार ९९६ हेक्टरवर बिजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित आहे.
Seed production of soybean on 6 thousand 996 hectares in summer season in Parbhani division
Seed production of soybean on 6 thousand 996 hectares in summer season in Parbhani division

परभणी ः  ‘महाबीज’च्या परभणी विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये सुधारित नियोजनानुसार येत्या (२०२२) उन्हाळी हंगामात सोयाबीनचा ६ हजार ९९६ हेक्टरवर बिजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित आहे. त्यापासून ७१ हजार ५४८ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान आणि बोनस दिला जाणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज घेऊन जिल्हानिहाय नोंदणी सुरू झाली आहे. ही माहिती महाबीजचे विभागीय व्यवस्थापक ए. एल. सोनोने यांनी दिली.

यंदाच्या खरीप हंगामात परभणी विभागात १७ हजार ८९२ हेक्टरवर सोयाबीनचा बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात आला. त्यापासून २ लाख ९९ हजार ६६९ क्विंटल बियोणे उत्पादन अपेक्षित होते. परंतु सततच्या पावसात भिजल्यामुळे बियाण्याच्या दर्जावर परिणाम झाला आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीचे २ लाख १७ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होऊ शकते. खरीप बियाणे उत्पादनात घट येणार असल्याने पुढील (२०२२) खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी येत्या उन्हाळी हंगामात बीजोत्पादन कार्यक्रमाचे नियोजन करा, असे निर्देश कृषी सचिव एकनाथ डवले यांनी दिले आहेत. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना यामध्ये सहभागी करून घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सोयाबीनच्या बीजोत्पादन क्षेत्रात वाढ करण्यात आली आहे. येत्या उन्हाळी हंगामात सोयाबीनच्या  एमएयूएस ७१, एमएयूएस १६२, एमएयूएस ६१२, फुले किमया, फुले संगम या वाणांचा ६ हजार ९९६ हेक्टरवर बीजोत्पादन प्रस्तावित आहे. गतवर्षीच्या (२०२१) उन्हाळी हंगामात महाबीजच्या परभणी विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ३१० हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात आला होता. 

येत्या उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदी करतांना यंदाच्या खरिपातील सोयाबीनला डिसेंबर-जानेवारी महिन्यात बाजार समित्यांमध्ये मिळालेले उच्चतम दर अधिक प्रोत्साहन अनुदान (इन्सेटिव्ह) अधिक बोनस (लाभांश) या पद्धतीने दर दिला जाणार आहे. 

अतिवृष्टीमुळे खरीप सोयाबीन बीजोत्पादनात घट आली आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात मोठ्या क्षेत्रावर बीजोत्पादन कार्यक्रम राबविला जाणार आहे. ऊस खोडव्यामध्ये बीजोत्पादन घेता येईल. शेतकऱ्यांना प्रोत्साहानपर अनुदान तसेच बोनस देण्यात येणार आहे. - ए. एल. सोनोने, विभागीय व्यवस्थापक, महाबीज, परभणी.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com