ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील अनंतात विलीन 

ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी मंत्री प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्यावर मंगळवारी (ता.१८) कसबा बावडा येथील पंचगंगा वैकुंठधाम स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कोणतेही धार्मिक विधी न करता शासकीय इतमामात त्यांना अग्नी दिला गेला.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील अनंतात विलीन 
Senior thinker Dr. N. D. Patil Anant merged

कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी मंत्री प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्यावर मंगळवारी (ता.१८) कसबा बावडा येथील पंचगंगा वैकुंठधाम स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कोणतेही धार्मिक विधी न करता शासकीय इतमामात त्यांना अग्नी दिला गेला. या वेळी त्यांची दोन मुले, सुना, नात यांच्यासह सामाजिक चळवळीमधील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या वेळी त्यांना पोलिस प्रशासनाने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोर पालन करून अंत्यविधी करण्यात आले.  तत्पूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयात सकाळी आठ वाजता डॉ. पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह राजकीय नेते, विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी व नागरिकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रीघ लावली होती. सरोजिनीताई पाटील, ज्येष्ठ नेते शरद पवार, ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रताप पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री सतेज पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार रोहित पवार, पार्थ पवार, सुहास पाटील, प्रशांत पाटील, संगीता पाटील, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार राजू शेट्टी आदींसह नागरिकांनी अंत्यदर्शन घेतले.  सोळा पोलिस कर्मचाऱ्यांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘लाल सलाम लाला सलाम, एन. डी. पाटील लाला सलाम’, ‘अमर रहे अमर रहे’, एन. डी. पाटील अमर रहे अशा घोषणा दिल्या. अंत्यसंस्कारावेळी कोणताही धार्मिक विधी करू नये, अशी इच्छा पाटील यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार कोणताही धार्मिक विधी या वेळी करण्यात आला नाही. रक्षा विसर्जन, दहावा दिवस असे कोणतेही धार्मिक विधी केले जाणार नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.