नगरमध्ये शेवगा १५०,  गवार १३० रुपये किलो 

येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (ता.२१) वाटाणा, गाजर, फ्लॉवरची आवक वाढली होती. घोसाळी, कारली, गवारीची आवक घटली.
Shevaga 150 in the town, Guar 130 rupees per kg
Shevaga 150 in the town, Guar 130 rupees per kg

पुणे  नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (ता.२१) वाटाणा, गाजर, फ्लॉवरची आवक वाढली होती. घोसाळी, कारली, गवारीची आवक घटली. वांगी, गवार, कारली, हिरवी मिरचीच्या भावात वाढ झाली होती. फळभाज्यांची १ हजार ११२ क्विंटल, बटाट्याची १९५ टोमॅटोची १८७, तसेच वाटाणा १८३ क्विंटल, हिरव्या मिरचीची १३० क्विंटल आवक झाली.  नगर बाजार समितीमधील फळभाज्यांचे क्विंटलचे भाव : टोमॅटो-एक हजार १०० ते एक हजार ८००, वांगी- सहा ते आठ हजार, फ्लॉवर- तीन ते साडेतीन हजार, कोबी- दोन ते अडीच हजार, काकडी- एक हजार २०० ते एक हजार ६००, गवार- अकरा ते तेरा हजार, घोसाळी- अडीच ते साडेतीन हजार, दोडका- साडेचार ते पाच हजार, कारली- चार ते सहा हजार, भेंडी- चार ते सहा हजार, वाल- तीन ते चार हजार, घेवडा- तीन ते चार हजार, डिंगरी- अडीच ते तीन हजार, बटाटा : एक ते एक हजार ३००, लसूण : साडेतीन ते पाच हजार, शेवगा- दहा ते १५ हजार, हिरवी मिरची- चार ते सहा हजार, दुधी भोपळा- एक ते दीड हजार, सिमला मिरची- साडेतीन ते पाच हजार, वाटाणा- अडीच ते तीन हजार रुपये.  पालेभाज्या शेकडा ः मेथी- ९०० ते एक हजार २००, पालक- एक हजार २०० ते एक हजार ४००, कोथिंबीर- एक हजार ४०० ते एक हजार ६००, कांदापात ८०० ते एक हजार, हरभरा जुडी- ८०० ते एक हजार रुपये.  फळे ः मोसंबी- तीन ते पाच हजार, संत्री- साडेतीन ते सहा हजार, डाळिंब-सात ते बारा हजार, पपई- एक हजार २५० ते दोन हजार, सीताफळ- अडीच ते चार हजार, चमेली बोर दोन हजार ५०० ते चार हजार, पेरू- एक हजार ७५० ते तीन हजार, अंजीर चार ते सहा हजार, द्राक्ष चार ते पाच हजार, सफरचंद- आठ ते अकरा हजार रुपये.    

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com