श्री काळाराम, कपालेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद

Shri Kalarama, Kapaleshwar Temple closed for darshan
Shri Kalarama, Kapaleshwar Temple closed for darshan

नाशिक  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव विचारात घेऊन अनेक ठिकाणी यात्रा, उत्सवांचे आयोजन रद्द करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांच्या ठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे. येथील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिर मंगळवार (ता.१७) दुपारपासून बंद करण्यात आले; तर सीता गुंफा मंदिर आणि आता श्री कपालेश्वर महादेव मंदिरही बंद करण्यात आले आहे.

शहरातील पंचवटी परिसरात श्री काळाराम व सीतागुंफा मंदिर बघण्यासाठी मोठी वर्दळ असते. भाविकांची होणारी गर्दी व संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाला सहकार्य म्हणून पुढील सूचना येईपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, याकाळात आतील दैनंदिन पूजाविधी व इतर दिनक्रम सुरळीत सुरू राहतील.

 रामकुंडावर शुकशुकाट

‘कोरोना’च्या भीतीने पर्यटकांची गर्दी कमी झाली आहे. त्यामुळे पहाटेपासून वर्दळ असलेल्या रामकुंडावर सद्या दशक्रिया विधींचा अपवाद वगळता शुकशुकाट आहे. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com