सिंधुदुर्ग जिल्ह्याला  ४० कोटींचा मदत निधी 

तौक्ते चक्रीवादळाने सर्वाधिक नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ४० कोटी १८ लाख ४२ हजार २०० रुपयांचा मदत निधी देण्यात येणार आहे. या शिवाय शासकीय नुकसानीची मदत वेगळी दिली जाणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

सिंधुदुर्गनगरी : तौक्ते चक्रीवादळाने सर्वाधिक नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ४० कोटी १८ लाख ४२ हजार २०० रुपयांचा मदत निधी देण्यात येणार आहे. या शिवाय शासकीय नुकसानीची मदत वेगळी दिली जाणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.  राज्य शासनाने चक्रीवादळातील नुकसानस्तांना २५२ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री सामंत यांची ऑनलाइन पत्रकार परिषद झाली. पालकमंत्री सांमत म्हणाले, ‘‘राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चक्रीवादळाच्या नुकसानीसाठी २५२ कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. यातील ४० कोटी १८ लाख ४२ हजार रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मिळणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आले असताना त्यांनी बाधितांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार ठामपणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे निकष डावलून मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली आहे.’’  चक्रीवादळात जिल्ह्यातील ३६ घरांची पूर्णतः पडझड झाली होती, त्या घरांकरीता ५४ लाख रुपये देण्यात येणार आहेत. ९ हजार ३४ घरांचे अंशतः नुकसान झाले असून, त्याकरिता १३ कोटी ५५ लाख १० हजार रुपये मदत मिळणार आहे. या शिवाय पिकांच्या नुकसानीपोटी १६ कोटी ८१ लाख रुपये मदत मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या शिवाय गोठे, मच्छीमार बोटी, मच्छीमारांच्या जाळीच्या दुरुस्तीकरिता देखील मदत केली जाणार आहे. सिंधुदुर्गप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याला ३० कोटी ७२ लाखांचा मदत दिला जाणार असल्याचेही सामत यांनी स्पष्ट केले. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com