कोकणगाव शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन

खंडित कलेला वीजपुरवठा त्वरित सुरू करावा. या मागणीसाठी कोकणगाव (ता. संगमनेर) वीज उपकेंद्रात शेतकरी व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २८) ठिय्या आंदोलन करून कामकाज बंद पाडले.
Sit-in agitation of Kokangaon Farmers Association
Sit-in agitation of Kokangaon Farmers Association

नगर ः संगमनेर तालुक्यातील कोकणगाव वीज उपकेंद्राशी संलग्न असेलेल्या गावांचा खंडित कलेला वीजपुरवठा त्वरित सुरू करावा. या मागणीसाठी कोकणगाव (ता. संगमनेर) वीज उपकेंद्रात शेतकरी व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २८) ठिय्या आंदोलन करून कामकाज बंद पाडले. 

वीजपुरवठा सुरू केल्या शिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी घेतली. महावितरणने संगमनेर तालुक्यातील रहिमपूर, कोकणगाव परिसरातील शेतीचा व घरांचा वीजपुरवठा चार दिवसांपासून खंडित केला. यामुळे शेतपिकांचे नुकसान होऊ लागले. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न निर्माण होऊ लागला. ही कारवाई नियमबाह्य आहे. महावितरण शेतकऱ्यांचे मानसिक व आर्थिक नुकसान करत आहे. 

वीजवितरण कंपनीने सतत १०० ते १५० व्होल्ट दाबानेच वीजपुरवठा करून कायदा भंग केला आहे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे लागते. वीज कायद्यानुसार थकबाकीदार ग्राहकांना कारवाई करण्याच्या १५ दिवस अगोदर नोटीस देणे बंधनकारक आहे. कोणतीही नोटीस न देता कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप करत पश्‍चिम महाराष्ट्र शेतकरी महिला आघाडीच्या नेत्या सीमा नरोडे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करून कामकाज बंद पाडले. या प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर शिंदे, तालुकाध्यक्ष रमेश शिंगोटे आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com