बांबू प्रक्रियेसाठी कौशल्याची आवश्यकता ः डॉ. सावंत

बांबू प्रक्रिया करण्यासाठी कौशल्याची आवश्यकता आहे. आवड असली तर नवनवीन कला, कौशल्य सहज शिकता येतात.’’ असे प्रतिपादन विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
बांबू प्रक्रियेसाठी कौशल्याची आवश्यकता ः डॉ. सावंत
Skills required for bamboo processing: Dr. Sawant

दापोली, जि. रत्नागिरी ः ‘‘विस्तार शिक्षण विभागामार्फत विद्यापीठात होणारे नवनवीन संशोधन हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम विविध उपक्रमांच्या माध्यमातून होत असते. बांबू प्रक्रिया करण्यासाठी कौशल्याची आवश्यकता आहे. आवड असली तर नवनवीन कला, कौशल्य सहज शिकता येतात.’’ असे प्रतिपादन विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली पुरस्कृत कृषी विद्यापीठे बळकटीकरण योजना आणि उपयोजना अंतर्गत ‘बांबू प्रक्रिया तंत्रज्ञान’ प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर वनशास्त्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अजय राणे, प्रा. डॉ. विनायक पाटील, डॉ. विश्‍वदीपक त्रिपाठी, रत्नागिरी जिल्हा बुरूड समाजाचे अध्यक्ष अशोक साळुंखे, दापोली तालुका बुरूड समाजाचे अध्यक्ष राजाराम माने, जिल्हा बुरूड समाजाचे जिल्हा प्रतिनिधी दत्ताराम माने आदी उपस्थित होते.

बांबू प्रक्रिया उद्योगाला भरपूर वाव आहे. बुरूड समाजातील महिलांना हे कौशल्य अवगत आहेच; परंतु नवीन काही शिकण्याचा ध्यास घेतला तर नक्कीच त्या यामध्ये स्वत:च्या समाजाचा विकास करू शकतात. त्यासाठी लागणारे प्रशिक्षण आणि तांत्रिक मार्गदर्शन त्यांना पूर्णपणे देण्यासाठी विद्यापीठ नक्कीच त्यांना मदत करेल, असे डॉ. सावंत यांनी सांगितले. बुरूड समाजाचे अध्यक्ष अशोक साळुंखे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 

दत्ताराम माने म्हणाले, की बांबू प्रक्रियाचे प्रशिक्षण घेऊन आपण उद्योग सुरू केला तर आपल्या दुर्लक्षित असलेल्या बुरूड समाजाची नवी ओळख निर्माण होईल. 

डॉ. अजय राणे यांनी उपस्थितांना बांबूच्या वेगवेगळ्या जाती, त्यांचा उपयोग तसेच बांबूला रासायनिक प्रक्रिया केल्याने होणारे फायदे याबाबत सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन तर डॉ. त्रिपाठी यांनी बांबूपासून प्रक्रिया करून अगरबत्ती कशी तयार करायची तसेच अगरबत्ती बनविण्याकरिता वापरण्यात येणारी अत्याधुनिक उपकरणे कृषी हाताळावीत याबद्दल प्रात्यक्षिकासह तांत्रिक मार्गदर्शन केले. बांबूपासून विविध हस्तकलेच्या वस्तू उदा. पेनस्टॅण्ड, फलॉवरपॉट, की-होल्डर, अ‍ॅम्प्लिफायर, घड्याळ, मॅट, कप, बैलगाडी आदी वस्तू अशा प्रकारे तयार करता येतात यावर माहिती दिली.

या वेळी प्रशिक्षणार्थी पूर्वा माने आणि अमित माने यांनी यांनी आपल्या मनोगतात नवीन पिढीला बुरूडकाम माहीत नाही. परंतु विद्यापीठाने अशा प्रकारची प्रशिक्षणे घेतल्यास आमची कला जागृत राहील आणि नवीन पिढीमध्ये बुरूडकामाची आवड निर्माण होईल असे सांगितले. दापोली खेड परिसरातील एकूण ३३  प्रशिक्षणार्थींनी या प्रशिक्षणवर्गात सहभागी झाले होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com