द्राक्ष निर्यातीसाठी आतापर्यंत  १८०० शेतकऱ्यांकडून नोंदणी

सांगलीजिल्ह्यातून युरोपसह अन्य परदेशात द्राक्षाची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. यंदाच्या हंगामात द्राक्षाची निर्यात करण्यासाठी नोंदणी सुरू झाली असून, आतापर्यंत १८८५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, नोंदणी झालेले क्षेत्र ९७७ हेक्टर इतके आहे.
So far for grape exports Registration from 1800 farmers
So far for grape exports Registration from 1800 farmers

सांगली ः जिल्ह्यातून युरोपसह अन्य परदेशात द्राक्षाची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. यंदाच्या हंगामात द्राक्षाची निर्यात करण्यासाठी नोंदणी सुरू झाली असून, आतापर्यंत १८८५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, नोंदणी झालेले क्षेत्र ९७७ हेक्टर इतके आहे. यंदाच्या हंगामात २० हजार शेतकऱ्यांच्या नोंदणीचा लक्ष्यांक कृषी विभागाने ठेवला आहे. त्यामुळे यंदा नोंदणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव आणि खानापूर या दोन तालुक्यांतून सर्वाधिक द्राक्षाची निर्यात होते. त्यापाठोपाठ मिरज तालुक्याचा क्रमांक आहे. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील शेतकरी द्राक्षाच्या निर्यातीसाठी पुढे आले असल्याचे चित्र आहे. यंदाच्या हंगामातील द्राक्ष निर्यात करण्यासाठी गेल्या आठवड्यात नोंदणीस प्रारंभ झाला आहे. कृषी विभागाकडून अधिकाधिक नोंदणीसाठी प्रयत्न होत असल्याचे दिसते आहे. एकाच आठवड्यात नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी संख्या वाढली आहे. नोंदणीसह नूतनीकरणदेखील केले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातून द्राक्षाच्या निर्यातीचा आलेख चढता राहिला आहे. दरवर्षी शेतकरी संख्या वाढत असून, निर्यातीच्या द्राक्ष क्षेत्रात वाढ होत आहे. गतवर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असून देखील १९ हजार टन द्राक्षाची निर्यात झाली होती. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि पडलेला पाऊस यामुळे निर्यातक्षम द्राक्ष बागांना काहीसा फटका बसला आहे. तरी देखील काटेकोर नियोजन करून शेतकऱ्यांकडून बागा जोपासल्या जात आहे. प्रतिकूल परिस्थितीत बागा जोपासून दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी शेतकरी नियोजन करत आहे. यंदाच्या हंगामात २० हजार शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे नियोजन कृषी विभागाने केले आहे.

तालुकानिहाय द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी  तालुका....शेतकरी संख्या ( क्षेत्र हेक्टरमध्ये)  खानापूर...७१७....(३७८.९०)   कडेगाव...२५....(१३.५३)   कवठेमहांकाळ...(३१६...१६४.९०)   पलूस....१११....(५४.३३ )  तासगाव....४२८....(२२२.७१ ) 

मिरज...२०१...(१०५.९४)   जत....५६....(३६.४५)   आटपाडी...१...(०४० )  एकूण...१८५५...(९७७.०६ ) v

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com