कार्तिक वारी नियोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

सोलापूर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर तसेच वारकरी संप्रदायाच्या प्रथा परंपरा अबाधित राखून कार्तिक वारीबाबत पूर्वतयारी म्हणून करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबतचा आढावा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नुकताच घेतला.
कार्तिक वारी नियोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
कार्तिक वारी नियोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

सोलापूर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर तसेच वारकरी संप्रदायाच्या प्रथा परंपरा अबाधित राखून कार्तिक वारीबाबत पूर्वतयारी म्हणून करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबतचा आढावा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नुकताच घेतला. कार्तिक यात्रा पूर्व नियोजनाबाबत जिल्हा नियोजन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, स्वप्नील रावडे, अभिजित पाटील उपस्थित होते.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता वारीच्या परंपरा अबाधित राखून तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक निर्णय घेण्यात येईल. यासाठी विविध विभागांनी वारीची पूर्वतयारी म्हणून कामांचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. यामध्ये नगरपालिका प्रशासनाने स्वच्छ पिण्याचे पाणी, तात्पुरती शौचालये, प्रदक्षिणा मार्गावरील रस्ते दुरुस्ती, साथीच्या रोगांच्या अनुषंगाने फवारणी, ६५ एकर व नदीपात्रातील वाळवंट स्वच्छता व सुविधेबाबतचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या. तसेच  कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर तपासणी व उपचारासाठी आवश्यक सुविधा, बेडची उपलब्धता, ऑक्सिजन पुरवठा कोविड केअर सेंटरची उपलब्धता याबाबतचाही आढावाघेतला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com