ज्वारीवर चिकट्याचा प्रादुर्भाव

नगरजिल्ह्यात काही भागात भुरभुर पाऊस झाला. चार दिवसांत बदलत्या वातावरणाचा ज्वारी, हरभरा व गव्हावर परिणाम होऊ लागला आहे.
ज्वारीवर चिकट्याचा प्रादुर्भाव
ज्वारीवर चिकट्याचा प्रादुर्भाव

नगर : जिल्ह्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून सातत्याने ढगाळ वातावरण आहे. अधून-मधून धुके पडत आहे. काही भागात भुरभुर पाऊस झाला. चार दिवसांत बदलत्या वातावरणाचा ज्वारी, हरभरा व गव्हावर परिणाम होऊ लागला आहे. नगर जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र असलेल्या ज्वारीवर मोठ्या प्रमाणात चिकटा, मावा पडला आहे. त्यामुळे ज्वारी काळी पडू लागली आहे. हरभऱ्यावरही घाटेअळीचा प्रादुर्भावाची भीती व्यक्त केली जात आहे.  नगर जिल्ह्यात खरिपात पावसाने पिकांचे नुकसान झाले. चांगल्या पावसाने रब्बीची पिके चांगली येण्याची आशा होती. मात्र, पिकांवर नैसर्गिक संकटाची मालिका मात्र संपायला तयार नाही. गेल्या काही दिवसांपासून सतत बदलते वातावरण निर्माण होत असल्याने रब्बीतील पिकेही अडचणीत येऊ लागली आहे. जिल्हाभरात सर्वाधिक अडीच लाख हेक्टरवर ज्वारी आहे. ९० हजार हेक्टर हरभरा तर ८० हजार हेक्टरच्या जवळपास गव्हाची पेरणी झालीय. मात्र, पोषक वातावरण नसल्याने ही पिके अडचणीत येऊ लागली आहेत.  पिकांसाठी पोषक असलेली थंडी गेल्या आठवड्यापासून गायब झाल्याने व पहाटेच्या वेळी धुके पडू लागल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. ज्वारीवर मावा, चिकटा पडल्याने ज्वारी काळी पडलीय, हरभऱ्यावर घाटेअळी पडण्याचा धोका वाढलाय. भाजीपाल्यावरही परिणाम दिसून येत आहे. शेतकऱ्यांची पिकावरील रोगराईमुळे फवारणीसाठी धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळे पिकांवरील खर्चातही वाढ झाली आहे. एका फवारणीसाठी एकरी ज्वारीसाठी ३०० ते ५०० रुपये तर गहू हरभऱ्यासाठी ५०० ते १ हजार रुपयांपर्यंत खर्च येत आहे.  कृषी विभाग दखल कधी घेणार?  रब्बीतील ज्वारी, हरभरा, गहू यासह इतर पिकांवर कमी जास्त प्रमाणावर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करणे, आवश्यक ती औषधे उपलब्ध करून देत प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची कृषी विभागाची जबाबदारी आहे. कापडावरील बोंडअळी रोखण्यासाठी कृषी विभागाने मोठा निधी खर्च करून ही बोंडअळी रोखता आली नसल्याने कापसाचे मोठे नुकसान झाले आणि कृषी विभागाचा निधीही वाया गेल्यासारखे झाले. आता रब्बीतील पिकांवरही होणारा रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेणे गरजेचे असताना मात्र तसे होताना दिसत नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com