‘महाबीज’चा सोयाबीन बियाणे देण्यास नकार

सांगली ः आता महाबीजने उन्हाळी सोयाबीन बियाणे देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
‘महाबीज’चा सोयाबीन बियाणे देण्यास नकार
Soybeans of ‘Mahabeej’ Refuse to give seeds

सांगली ः खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याची कमतरता भासू नये, या साठी उन्हाळी सोयाबीन पेरणीसाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला होता. त्यानुसार महाबीज बियाणे उपलब्ध करून देणार होते. त्यासाठी महाबीजने शेतकऱ्यांना उन्हाळी सोयाबीन पेरणीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील २ हजारहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, आता महाबीजने उन्हाळी सोयाबीन बियाणे देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

यंदा उन्हाळ्यात सोयाबीन पेरणीसाठी २ हजार हेक्टरचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले होते. दरम्यान, महाबीजने सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली. महाबीजने कृषी विभागाला हाताशी धरुन बियाणे पुरवठा करू, असे सांगितले. नोंदणीसाठी एकरी १०० रुपये शुल्क देखील ठेवले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी शुल्क भरून नोंदणी देखील केली. 

उत्पादित झालेले सोयाबीन हे महाबीज बाजारभावाप्रमाणे खरेदी करणार होते. त्यावर त्यांना प्रोत्साहनपर रक्कमही दिली जाणार, असे जाहीर केले होते. सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन पेरणीसाठी शेतीची मशागत पूर्ण करून पेरणीचे नियोजन केले आहे.

मात्र, बियाणे मागणीसाठी शेतकरी महाबीजकडे विचारणा करू लागले आहेत. परंतु, सोयाबीनचे पुरेसे बियाणे उपलब्ध नाही. त्यामुळे महाबीजकडून सांगण्यात असल्याचे कृषी विभागाने सांगितले. 

महाबीजकडून बियाणे देण्यासाठी नोंदणी करतेवेळी प्रतिएकरी १०० रुपये शुक्ल आकारले आहे. अर्थात, शेतकऱ्यांकडून शुल्क आकारणी  करून देखील महाबीज सोयाबीनचे बियाणे उपलब्ध करून देत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. त्यामुळे कृषी राज्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.