राज्य शासनाने दूध उत्पादकांना  अर्थसाह्य करावे : अनिल घनवट

लॉकडाउनमुळे संकटात असलेल्य‍ा दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाने आर्थिक साह्य द्य‍ावे, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
राज्य शासनाने दूध उत्पादकांना  अर्थसाह्य करावे : अनिल घनवट State government to milk producers Finance: Anil Ghanwat
राज्य शासनाने दूध उत्पादकांना  अर्थसाह्य करावे : अनिल घनवट State government to milk producers Finance: Anil Ghanwat

नगर : लॉकडाउनमुळे संकटात असलेल्य‍ा दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाने आर्थिक साह्य द्य‍ावे, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली. अनिल घनवट म्हणाले, ‘‘शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. जानेवारी २०२०पासून राज्यात सतत लॉकडाउन होत असल्यामुळे हॉटेल व्यवसाय बंद आहे. ग्राहक नसल्यामुळे दुधाला मागणी नाही. दुधाचे दर कोसळले आहेत. गायीच्या दुधाचा खर्च सुमारे ३० रुपये प्रती लिटर पेक्षा जास्त असताना सध्या दुधाला फक्त २० ते २१ रुपयेच प्रति लिटर दर मिळत आहे. इतर व्यवसायांप्रमाणे दूध व्यवसायाचे शटर खाली ओढून बंद करता येत नाही. गोवंश हत्याबंदी कायद्यांमुळे जनावरे विकून व्यवसाय बंद करणे सुद्धा शक्य नाही. गायीच्या दुधाचा उत्पादन खर्च प्रति लिटर ३० रुपये आहे (यात नफा समाविष्ट नाही). सध्या २० ते २१ रुपये प्रती लिटर दर मिळत आहे. लॉकडाउन वाढल्यास आणखी कमी होण्याची शक्यता आहे. प्रति लिटर, सुमारे १० रुपये होणाऱ्या तोट्याची नुकसान भरपाई राज्य सरकारने द्य‍ावी. या वर्षी (२०२१) मध्ये दूध उत्पादक शेतकऱ्याने डेअरीला विकलेल्या दुधाचे प्रती लिटर १० रुपये प्रमाणे नुकसान भरपाई, शासनाने थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या निवेदनात केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com