इंधन दरवाढीविरोधात राज्यभरात ‘भडका’ 

केंद्र सरकारच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या किमती वाढल्याचा आरोप करीत राज्यातील सत्ताधारी शिवसेनेने केंद्र सरकारच्या विरोधात शुक्रवारी (ता. ५) राज्यभरात आंदोलने केली.
इंधन दरवाढीविरोधात राज्यभरात ‘भडका’ Statewide 'outburst' against fuel price hike
इंधन दरवाढीविरोधात राज्यभरात ‘भडका’ Statewide 'outburst' against fuel price hike

पुणे : केंद्र सरकारच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या किमती वाढल्याचा आरोप करीत राज्यातील सत्ताधारी शिवसेनेने केंद्र सरकारच्या विरोधात शुक्रवारी (ता. ५) राज्यभरात आंदोलने केली. शिवसेनेचे स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी या आंदोलनात रस्त्यावर उतरले होते. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नांदेड, परभणी, लातूर आदी ठिकाणी शिवसेनेने आंदोलने केली. मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी आंदोलन स्थळे दणाणली होती. 

कोरोना लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर २०हून अधिक वेळा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोलच्या किमती ९३ रुपयांवर तर डिझेल दरवाढ ८० रुपयांवर पोहोचल्या आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचे दरही दिवसेंदिवस वाढत आहेत. इंधन दरवाढीचा भडका उडवून केंद्र सरकारने सर्वसामान्यांची लूट सुरू केली आहे, असा आरोप शिवसेना नेते, खासदार गजानन किर्तीकर यांनी केला.

त्यांच्यासह आमदार सुनील प्रभू, आमदार रवींद्र वायकर यांच्या नेतृत्वाखाली गोरेगाव रेल्वे स्थानक परिसरात निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारचा गैरकारभार, पेट्रोल-डिझेल दरवाढीचा जनतेवर भार!, रद्द करा, रद्द करा, इंधन दरवाढ रद्द करा, सारी जनता एक हो, एक होके केंद्र सरकार को फेक दो, मोदी सरकार मुर्दा बाद.... केंद्र सरकार हाय हाय... अशा जोरदार घोषणांनी गोरेगाव रेल्वे स्थानक परिसर शिवसैनिकांनी दणाणून सोडला होता 

पुणे जिल्ह्यात नारायणगाव येथे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेने आंदोलने केले. कोरोना महामारी, बेरोजगारी व महागाई यामुळे जनता होरपळत असताना पेट्रोल, डिझेल व घरगुती वापराचा गॅस या इंधनाची दरवाढ करून केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिला नाही, अशी टीका त्यांनी केली.

औसा (जि. लातूर) इंधन दरवाढीच्या विरोधात सेनेकडून गाडी ढकलो आंदोलन करण्यात आले. दर दिवशी होणारी दरवाढ ही सर्व सामान्य जनतेला परवडणारी नाही. नागरिक कंटाळून गेले आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात जनतेमध्ये रोष पसरला आहे, असा आरोप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांनी केला. नांदेड येथे बैलगाडीतून मोर्चा काढण्यात आला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com