सोयाबीनचे चुकीचे पीक कापणी प्रयोग थांबवा

नांदेड : चुकीच्या पद्धतीने होणारे सोयाबीनचे पीककापणी प्रयोग थांबवून ते सुधारित पद्धतीने करावेत. या सोबतच पीक आणेवारी काढण्याच्या पद्धतीत सुधारणा करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, शंघटनेचे नांदेडचे जिल्हाध्यक्ष हणुमंत राजेगोरे यांनी मंगळवारी (ता. २९) कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली.
Stop experimenting with the wrong crop of soybeans
Stop experimenting with the wrong crop of soybeans

नांदेड : चुकीच्या पद्धतीने होणारे सोयाबीनचे पीककापणी प्रयोग थांबवून ते सुधारित पद्धतीने करावेत. या सोबतच पीक आणेवारी काढण्याच्या पद्धतीत सुधारणा करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, शंघटनेचे नांदेडचे जिल्हाध्यक्ष हणुमंत राजेगोरे यांनी मंगळवारी (ता. २९) कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली.

सध्या सोयाबीनच्या पिकाचे कापणी प्रयोग चुकीच्या पद्धतीने काढून अधीकची उत्पादकता दाखविण्यात येत आहे. सोयाबीन पीक कापणी प्रयोगामध्ये निश्चित केलेल्या क्षेत्रातील पीक कापून ठेवणे आणि पुढील २ ते ३ दिवसांत ते संपूर्ण वाळल्यानंतर त्याचे वजन करणे आणि उत्पादकता काढणे अपेक्षित आहे. मात्र एकाच दिवसात २ तासांच्या आताच संपूर्ण पीक कापणी प्रयोग उरकण्यात येतो. पीककापणीनंतर त्याचे वजन करण्यात येते. त्यानंतर सोयाबीन बडवून त्याचे बियाणे काढून त्याचे वजन करण्यात येते. आलेल्या वजनानुसार सोयबीनची उत्पादकता निश्चित करण्यात येते. 

या प्रक्रिये दरम्यान कृषि विभागाचे कर्मचारी किंवा पीक विमा कंपनी प्रतिनिधी या पैकी कुणाकडेही आद्रता मीटर नसते. तरीपण ते पीक कापणी प्रयोग मोबाइल ॲपमध्ये शून्य आर्द्रता नोंदवतात, असे निवेदनात म्हटले आहे. अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी प्रत्यक्षात आद्रता मीटर आणून मोजले असता १५ ते ३० चे आद्रता निघते. त्यामुळे प्रत्यक्ष आद्रता पीक कापणी प्रयोगात ग्रहित धरण्यात येत नाही. काडी कचरा व डागी सोयाबीनही साफ करण्यात येत नाही. त्यामुळे काढण्यात आलेली सोयाबीनची उत्पादकता पूर्णपणे चुकीची येत आहे. 

कर्मचाऱ्यांना तातडीने आद्रता मीटर देवून मोबाइल ॲपमध्ये प्रत्यक्ष शेतावरील आद्रता नोंदविण्यात यावी. त्यानंतर प्रत्यक्ष येणाऱ्या आकडेवारीवर उत्पादकता काढावी, असे निवेदनात म्हटले आहे.

सध्याच्या उत्पादकता काढण्याच्या पद्धतीत महसूल मंडळनिहाय पीक कापणी प्रयोग करण्यात येतात. परंतु मागील काही वर्षांत अवकाळी आणि मान्सून पाऊस यांचा पॅटर्न बदलला आहे. एकाच महसूल मंडळात एका गावात अतिवृष्टी, तर एका गावात कोरडे, अशी पहावयास मिळते. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानावावर आधारित गावनिहाय पीक उत्पादकता काढण्याची नवीन पध्दत आणणे आवश्यक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com