मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंद

मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंद
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंद

औरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत दूध संकलन बंद झाले. उत्पादकांनी दूध न घालून तर संकलन करणाऱ्यांनी आपली केंद्रे बंद ठेऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. औरंगाबाद जिल्ह्यातील लाखगंगा येथील दूध उत्पादकांनी सोमवारी (ता. १६) ग्रामदैवत हनुमंताला दुग्धाभिषेक करून गावातील दूध संकलन बंद ठेवत दूध दराविषयीच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला.

या वेळी दुधाला मागणीनुसार दर मिळण्याविषयी घोषणाबाजीही करण्यात आली. लाखगंगा गावासोबतच परिसरातील बापतारा पुरणगाव, डोणगाव, बाभूळगाव गंगा, सावखेड गंगा, हिंगोणी आदी गावांतही दूध संकलन बंद ठेवण्यात आले. त्यामुळे जवळपास १६ ते १७ हजार लिटर दूध संकलनाला ब्रेक लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी सकाळच्या दूध संकलनात जवळपास चाळीस हजार लिटर दूध संकलनाला ब्रेक लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्हा दूध संघाच्या संकलनात मात्र केवळ पैठण व कन्नड तालुक्‍यांतील जवळपास सहा हजारांची घट वगळता फारसा फरक पडला नसल्याचे दूध संघाकडून सांगण्यात आले. बीड जिल्ह्यातील आष्टी, गेवराई व बीड तालुक्‍यांतील दूध संकलनात जवळपास दोन लाख लिटरची घट आल्याचे सूत्रांनी सांगितले. मिळणारा दर खर्चाला परवडत नसल्याने आंदोलनाला पाठिंबा देत दूध संकलनाकडे पाठ फिरविल्याचे बीड तालुक्‍यातील उत्पादकांनी सांगितले.

मुक्‍या प्राण्यांना पाजले दूध औरंगाबाद जिल्ह्यातील भिवधानोरा येथील दूध संकलन केंद्रावरील संकलन सोमवारी (ता. १६) बंद करून सर्व शेतकरी बांधवांनी भोलेनाथाला दुग्ध अभिषेक करण्यात आला. दुध फेकून देण्याऐवजी मुक्‍या प्राण्यांना कुत्रे, मांजरांना दूध पाजून अनोखे आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी तालुका अध्यक्ष संपत रोडगे, भाऊसाहेब शेळके उपजिल्हा प्रमुख प्रहार शेतकरी संघटना औरंगाबाद, दादासाहेब चव्हाण, दत्तात्रेय शिंदे, बाळासाहेब दुबे, शंकर चव्हाण, शांमद भाई, राजेंद्र चव्हाण, बाळासाहेब गाडेकर व भिवधानोरा परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com