वीजपुरवठा सुरळीत करा; ‘बळिराजा’ची मागणी

जालना : महावितरणने शेतकऱ्यांकडे थकबाकी दाखवून वसुलीच्या नावाखाली वीजजोड तोडण्याची कारवाई सुरू आहे. ती थांबवून शेतकऱ्यांच्या शेतात वीज जोडून, पोल, डीपी, टॉवर यासाठी वीज कायद्यानुसार नुकसान भरपाई व भाडे द्यावे, अशी मागणी बळिराजा फाउंडेशनने केली आहे.
वीजपुरवठा सुरळीत करा; ‘बळिराजा’ची मागणी
Streamline power supply; Demand for ‘Baliraja’

जालना : महावितरणने शेतकऱ्यांकडे थकबाकी दाखवून वसुलीच्या नावाखाली वीजजोड तोडण्याची कारवाई सुरू आहे. ती थांबवून शेतकऱ्यांच्या शेतात वीज जोडून, पोल, डीपी, टॉवर यासाठी वीज कायद्यानुसार नुकसान भरपाई व भाडे द्यावे, अशी मागणी बळिराजा फाउंडेशनने केली आहे.

निवेदानानुसार, शेतकऱ्यांना वीज कायद्याची माहिती नसल्याने त्याचा गैरफायदा घेऊन महावितरण व राज्य सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न देता त्यांची फसवणूक करीत आहे. वीज कायदा २००३ व लायसन्स रुल २००५ याची गावनिहाय माहिती द्यावी. तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील ७२ हजार ८६० शेतकऱ्यांना अद्यापही २५ टक्के अनुदान मिळालेले नाही. ते तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे. असंख्य शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही. तातडीने विम्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करावी. ओल्या दुष्काळाची परिस्थिती असल्याने वीजबिल माफ करावे, आदी मागण्यांचे निवेदन फाउंडेशनतर्फे तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले.

तहसिलचे कर्मचारी प्रवीण होनूले यांना निवेदन देण्यात आले. भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे, लिंगेवाडी, बाभूळगाव, कोदोली, सोयगाव देवी, नांजा, क्षिरसागर या गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन निवेदन दिले. निवेदनावर फांउडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे, संदीप भोकरे, राहुल साबळे, श्रीराम सहाणे, अंकुश साबळे, राजू साबळे, शरद खरात, दिलीप मगरे, समाधान मोरे, गणेश मोरे,नवनाथ साबळे, किसन कोलते, राजू ढोके, दिनेश बिडवे, दीपक बेडके आदींच्या सह्या आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.