साखर कारखान्यांच्या कर्जांची चौकशी करा

नगर जिल्ह्यात साखर कारखान्यांना दिलेले कर्ज नियमानुसार आहे का? ज्या कारखान्यांना कोट्यवधी रुपयाचे कर्ज दिले, त्या कारखान्यांकडे तेवढी मालमत्ता, कर्ज फेडण्याची हमी आहे का? असा प्रश्न शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी उपस्थित केला आहे.
साखर कारखान्यांच्या कर्जांची चौकशी करा Of sugar factories Investigate debts
साखर कारखान्यांच्या कर्जांची चौकशी करा Of sugar factories Investigate debts

नगर : शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायचे झाल्यास अत्यंत बारकाईने कागदपत्रे तपासून कर्ज दिले जाते. शेतकऱ्यांना नियमानुसार कर्ज दिले जात असले तरी नगर जिल्ह्यात साखर कारखान्यांना दिलेले कर्ज नियमानुसार आहे का? ज्या कारखान्यांना कोट्यवधी रुपयाचे कर्ज दिले, त्या कारखान्यांकडे तेवढी मालमत्ता, कर्ज फेडण्याची हमी आहे का? असा प्रश्न शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी उपस्थित केला आहे.  नगर जिल्हा बॅंकने गेल्या पाच वर्षांत साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाची विशेष पथकामार्फत चौकशी करून वस्तूस्थिती लोकांसमोर आणावी. कर्ज वाटपात नियमबाह्यता आढळल्यास तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.    दहातोंडे यांनी निवेदनात म्हटले आहे, ‘‘राज्यात नव्हे तर देशात सहकारात अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा नावलौकीक आहे. मात्र येथे काही राजकीय लोक कर्ज मिळवण्यासाठी राजकीय वजन  वापरत असल्याचे आमचे मत आहे. बॅंकेत बहुतांश साखर साखर कारखान्यांशी संबंधित नेते संचालक आहेत. बॅँकेने गेल्या पाच वर्षांत नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना कर्जवाटप केलेले आहे. त्यातील मोठ्या प्रमाणात कर्ज कारखान्यांकडे थकीत आहे. या कारखान्यांना कर्जवाटप करताना कारखान्यांकडे जेवढे कर्ज दिले, तेवढी मालमत्ता व अथवा कर्जफेड करण्याची हमी देणारी कोणती बाब आहे का? कर्ज देताना कोणते निकष लावले आहेत. बहुतांश कारखान्यांना नियमबाह्य कर्ज दिल्याचा संशय आहे. त्यामुळे कोणत्या साखर कारखान्यांना किती कर्ज दिलेले आहे? कर्ज देताना कोणते निकष लावले, कर्ज देण्यासाठी कोणी शिफारस केली? कारखान्याकडे तेवढी मालमत्ता आहे का? हे लोकांना कळावे. त्या अनुषंगाने मागील पाच वर्षांत दिलेल्या कर्जाची चौकशी करावी आणि कर्ज वाटपात नियमबाह्यता आढळून आल्यास तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळावर कारवाई व्हावी, अशी मागणी दहातोंडे यांनी केली आहे. दखल घेतली नाही तर जिल्हा सहकारी बॅंकेच्या कार्यालयात शेतकरी मराठा महासंघाचे कार्यकर्ते आंदोलन करतील, असा इशाराही दिला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com