मराठवाड्यात साखर उत्पादन  १ कोटी १४ लाख क्‍विंटलवर 

दाच्या ऊस गाळप हंगामात प्रत्यक्ष गाळपाला महिनाभराने उशिराने सुरुवात झाली. परंतु आता गती पकडली आहे. मराठवाड्यात साखरेचे उत्पादन १ कोटी क्‍विंटलपुढे गेल्याचे चित्र आहे.
मराठवाड्यात साखर उत्पादन  १ कोटी १४ लाख क्‍विंटलवर 
Sugar production in Marathwada 1 crore 14 lakh quintals

औरंगाबाद : यंदाच्या ऊस गाळप हंगामात प्रत्यक्ष गाळपाला महिनाभराने उशिराने सुरुवात झाली. परंतु आता गती पकडली आहे. मराठवाड्यात साखरेचे उत्पादन १ कोटी क्‍विंटलपुढे गेल्याचे चित्र आहे. जवळपास ५४ कारखान्यांनी या ऊस गाळपात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला असल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.  यंदाच्या ऊस गाळपासाठी मराठवाड्यातील ५६ कारखान्यांना गाळप परवाना आहे. त्यापैकी ५४ कारखान्यांनी ११ जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष गाळपात सहभाग नोंदविला आहे. या कारखान्यांमध्ये उस्मानाबादमधील १२, औरंगाबादमधील ७, जालन्यातील ५, बीडमधील ४, परभणीतील ६, हिंगोलीतील ५, नांदेडमधील ६ व लातूरमधील ९ साखर कारखान्यांचा सहभाग आहे. बीडमधील वैद्यनाथ व लातूरमधील परमेश्‍‌वर शुगरचा प्रत्यक्ष गाळपात सहभाग दिसून आला नाही. हे दोन कारखाने वगळता सहभागी ५४ कारखान्यांनी १ कोटी १४ लाख २३ हजार ५५० टन उसाचे गाळप करत १ कोटी ८ लाख ७१ हजार ८२५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. हे साखर उत्पादन करताना लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा साखर उतारा सरासरी १०.२६ टक्‍के, तर बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा सरासरी सर्वात कमी ८.७८ टक्‍के राहिला आहे. 

अतिरिक्‍त उसाचा प्रश्‍‌न ऐरणीवर  आधीच उशिराने सुरू झालेल्या गाळप हंगामामुळे ऊस उत्पादकांची परवड होताना दिसते. जालना व बीड जिल्ह्यांत अतिरिक्‍त उसाचा प्रश्‍‌न ऐरणीवर आहे. इतर जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात अतिरिक्‍त ऊस प्रश्‍नाची तीव्रता आहेच. तोडणीअभावी उसाला फुटलेले तुरे व त्यामुळे उत्पादकांचे होणारे नुकसान पाहता अतिरिक्‍त उसाचा प्रश्‍‌न तातडीने मार्गी लावण्याची आवश्‍यकता आहे. जालना व बीड जिल्ह्यातील अतिरिक्‍त उसाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. क्षमतेपेक्षा जास्त वा क्षमतेप्रमाणे सुरू असलेले कारखाने पाहता अतिरिक्‍त उसाचा प्रश्‍‌न निकाली निघेल का हा प्रश्‍‌न आहे. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.