खानदेशात उन्हाळी बाजरी पेरणी रखडत

खानदेशात उन्हाळी बाजरीची पेरणी सुमारे तीन हजार हेक्टरवर पोहोचली आहे. पेरणी सुरू आहे. यंदा पेरणी सहा ते सात हजार हेक्टरवर पोहोचेल, असा अंदाज आहे.
Summer millet sowing delayed in Khandesh
Summer millet sowing delayed in Khandesh

जळगाव : खानदेशात उन्हाळी बाजरीची पेरणी सुमारे तीन हजार हेक्टरवर पोहोचली आहे. पेरणी सुरू आहे. यंदा पेरणी सहा ते सात हजार हेक्टरवर पोहोचेल, असा अंदाज आहे. 

पेरणी सध्या रखडत सुरू आहे. थंडी व पावसाचे पुढील संकेत, यामुळे शेतकरी जानेवारीच्या अखेरीस पेरणीचे नियोजन करीत आहेत. बाजरीच्या उगवणीसाठी उष्णता व निरभ्र वातावरण आवश्यकत असते, असे शेतकरी मानतात. सध्या सकाळी थंडी बऱ्यापैकी असते. दुपारचे ऊन फारसे वाढलेले नाही. कपाल तापमान ३२ अंश सेल्सिअस खालीच आहे. यामुळे शेतकरी सध्या बाजरीची पेरणी करणे टाळत आहेत.  बाजरीचे दर्जेदार वाण, बियाणे बाजारात आहे. त्याचा तुटवडा नाही. हवे ते वाण उपलब्ध आहेत. पण पक्ष्यांपासून संरक्षणासाठी उपलब्ध असणारे प्रतिबंधात्मक वाण शेतकरी पेरत आहेत. काही शेतकरी कमी कालावधी व मध्यम, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत येणारे वाण पेरत आहेत. बाजरीला सिंचनासाठी पाणी कमी आवश्यक असते. तीनदा पाणी द्यावे लागते. पेरणीला २५ जानेवारीनंतर आणखी वेग येईल.त्यासाठी अनेकांनी पूर्वमशागत करून घेतली आहे. काही शेतकरी ठिबकच्या माध्यमातून सिंचन करण्याचे नियोजन करीत आहेत. यामुळे उत्पादनात वाढ होईल, असेही शेतकरी मानतात.

केळी, कपाशीनंतर बाजरी... तापी, गिरणाकाठी काही शेतकऱ्यांनी ठिबकवर पेरणी केली आहे. अनेक शेतकरी कांदेबाग केळीची काढणी पूर्ण झाल्याने त्यातही पेरणी करीत आहेत. कमाल कृत्रिम जलसाठाधारक शेतकरी कापसाखालील रिकाम्या क्षेत्रात पेरणी करीत आहेत. सध्या जळगाव जिल्ह्यातील भडगाव, पाचोरा, एरंडोल, चाळीसगाव, पारोळा, अमळनेर या भागांत पेरणी बऱ्यापैकी दिसत आहे. चोपडा, यावल, जामनेर या भागातही काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. धुळ्यातील शिंदखेडा, साक्री, धुळे व शिरपूर या सर्वच भागांत बाजरीची पेरणी सुरू आहे. नंदुरबारमधील नवापूर, नंदुरबार, तळोदा भागातही बाजरीची पेरणी सुरू आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com