मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारीपदी बोरकर; कृषी विभागात बदल्या

मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारीपदी बोरकर; कृषी विभागात बदल्या
मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारीपदी बोरकर; कृषी विभागात बदल्या

पुणे : राज्य कृषी विभागाच्या मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारीपदी सुनील बोरकर यांची नियुक्ती झाली आहे. या जागी वादग्रस्त ठरलेले सुभाष काटकर यांच्याकडे एनएचएमच्या प्रकल्प संचालक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.  तत्कालीन कृषी संचालक विजयकुमार इंगळे यांच्या कालावधीत गुण नियंत्रण विभागातील अनेक घोटाळे बाहेर आले. त्यामुळे गुण नियंत्रण विभागाचे प्रमुख श्री. काटकर यांना रजेवर पाठविण्यात आले होते.  “गुण नियंत्रण विभागाच्या प्रमुखपदी श्री. बोरकर यांच्या नावाची चर्चा गेल्या दोन वर्षांपासून सुरू होती. त्यांची शिफारसदेखील मुख्यमंत्र्यांकडे केली गेली होती. मात्र, ऐनवेळी श्री. काटकर यांची नियुक्ती झाली. परंतु, श्री. बोरकर यांना अखेर न्याय मिळाला,’ अशी माहिती सूत्रांनी दिली.   श्री. बोरकर हे सध्या सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ)पदी कार्यरत होते. एसएओच्या अडकलेल्या इतर बदल्यांनाही मुहूर्त मिळाला आहे. लातूरचे एसएओ संतोश आळसे आता परभणीत काम बघतील. अमरावती महसूल आयुक्तालयातील रोहयोचे शंकर तोटावार एसएओ आता वाशीम एसएओ म्हणून कार्यरत असतील. नाशिकच्या रामेतीचे प्राचार्य सुनील वानखेडे आता नाशिकच्याच जेडीए कार्यालयाचे एसएओ म्हणून काम बघणार आहेत. श्री. वानखेडेंच्या जागेवर ठाणे महसूल आयुक्तालयातील रोहयोचे एसएओ संजय पाटील यांची नियुक्ती झाली आहे. 

पुणे वसुंधरा युनिटमध्ये पाणलोटाचे उत्तम काम करणारे सहमुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज घोरपडे यांना रत्नागिरीचे एसएओपद मिळाले आहे.  वाशीमचे एसएओ दत्तात्रेय गावसाने यांची लातूरला, तर रत्नागिरीचे एसएओ शिवाजी जगताप यांना नगरला त्याच पदावर बदली मिळाली आहे. 

सिंधुदुर्गचे एसएओ शिवाजी शेळके यांची नियुक्ती आता सांगलीत आत्माचे प्रकल्प संचालकपदी झाली आहे. सांगलीचे आत्मा प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी आता सिंधुदुर्गचे एसएओ बनले आहेत.  काही अभ्यासू अधिकाऱ्यांची मात्र फरपट झाली आहे. कृषी शिक्षण परिषदेत सहसंचालकपदी असलेल्या गणेश घोरपडे यांची बदली थेट गोंदियाच्या एसएओपदी झाल्याने आश्वर्य व्यक्त केले जात आहे.  मुळे दक्षता पथकाचे प्रमुख राज्याच्या कृषी दक्षता पथकाचे कामकाज अतिशय उत्तमपणे सांभाळल्याबद्दल आयुक्तालयापासून ते मंत्रालयापर्यंत पसंतीस उतरलेल्या केशवराव मुळे यांना याच पथकाचे प्रमुख म्हणून कायम नियुक्ती मिळाली आहे. श्री. मुळे यांची मूळ नियुक्ती आत्माच्या सहसंचालकपदी होती. मात्र, त्यांच्या कामाची हातोटी पाहून त्यांना दक्षता पथकाचे प्रमुखपद व गुण नियंत्रण विभागाचे प्रमुख पददेखील देण्यात आले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com