क्लस्टरच्या माध्यमातून शेतमाल निर्यातीला गती 

केंद्र सरकारच्या कृषी निर्यात धोरणांतर्गत पणन मंडळाने विविध पिकांचे कृषी हवामान विभागनिहाय २१ क्लस्टर स्थापन केले आहेत. या माध्यमातून शेतीमाल निर्यातीला गती मिळणार आहे.
export
export

पुणे ः केंद्र सरकारच्या कृषी निर्यात धोरणांतर्गत पणन मंडळाने विविध पिकांचे कृषी हवामान विभागनिहाय २१ क्लस्टर स्थापन केले आहेत. या माध्यमातून शेतीमाल निर्यातीला गती मिळणार आहे. यामुळे निर्यातीत महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील, असा विश्‍वास राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी व्यक्त केला. कृषी निर्यात धोरणांतर्गत राज्यातील विविध घटकांना निर्यातीद्वारे प्रोत्साहन देण्याबरोबरच अडचणी जाणून घेण्यासाठी पणन मंडळाच्या वतीने शुक्रवारी (ता.१२) दूरदृश्‍यप्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, व्यवस्थापकीय संचालक दीपक शिंदे, सोलापूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र माने, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. मल्लिकार्जुन, कांदा लसूण संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. आर. बी. काळे, पुष्पसंशोधन संचालनालयाचे शास्त्रज्ञ डॉ. गणेश कदम, राज्य फलोत्पादन व औषधी मंडळाचे सल्लागार गोविंद हांडे, पणन मंडळाच्या निर्यात विभागाचे प्रमुख सतीश वराडे, मंगेश कदम, फळे भाजीपाला निर्यात संघटनेचे माजी उपाध्यक्ष इक्रम हुसैन, निर्यातक्षम फूल उत्पादक रूपक बेरी आदी मान्यवर उपस्थित होते. 

या वेळी पवार म्हणाले, ‘‘राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने विविध ठिकाणी सुमारे ४५ निर्यात सुविधा केंद्रे उभारली आहेत. या केंद्राद्वारे विविध देशांच्या मागणीनुसार निर्यात सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याचा लाभ स्थानिक शेतकऱ्यांसह निर्यातदारांना होत आहे.’’ 

दरम्यान, विविध मान्यवरांनी निर्यात क्षेत्रातील बदलांविषयी मार्गदर्शन केले. पुणे विभागीय उप सरव्यवस्थापक प्रशांत सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. तर आदित्य माने यांनी आभार मानले.  अडचणी सोडविण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना राज्यातून जास्तीत जास्त शेतीमाल निर्यात व्हावा, यासाठी तरुण शेतकऱ्यांना पणन मंडळाच्या वतीने निर्यातीचे प्रशिक्षण दिले जात आहे. याद्वारे शेतकरी स्वतः निर्यात झाले आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांच्या शेतमालाला परकीय बाजारपेठ उपलब्ध होऊन, उत्पन्नवाढीसाठी झाला आहे. शेतकऱ्यांना थेट निर्यातीसाठी होणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी पणन मंडळाने स्वतंत्र कक्षदेखील स्थापन केला आहे. याद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या जात आहेत, असेही पवार यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com