वाशीम समितीच्या गैरव्यवहारप्रकरणी सचिव निलंबित ः राम शिंदे

वाशीम समितीच्या गैरव्यवहारप्रकरणी सचिव निलंबित ः राम शिंदे
वाशीम समितीच्या गैरव्यवहारप्रकरणी सचिव निलंबित ः राम शिंदे

मुंबई ः  वाशीम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी पणनमंत्री राम शिंदे यांनी काल (ता. २६) विधानसभेत या समितीच्या सचिवाच्या निलंबनाची आणि प्रशासक मंडळ बरखास्त करण्याची घोषणा केली.  आमदार सुनील केदार, सुनील देशमुख आणि राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी या बाजार समितीत गैरव्यवहार झाल्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला शिंदे यांनी उत्तर दिले. या गैरव्यवहाराची अमरावती विभागीय सहसंचालक यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल. तसेच सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी ग्वाहीही मंत्री शिंदे यांनी दिली.  बोर्डी (जि. पालघर) येथील चिकू महोत्सव आयोजकांच्या गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी विधानसभेत दिले. आमदार पास्कल धनारेंनी या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. इतर संस्था पात्र नसल्याने रुरल इन्ट्रपिनर्स वेलफेअर फाउंडेशनला २४ लाखांचे कंत्राट दिले होते. आत्तापर्यंत ५ लाख रुपये दिले असल्याचेही आदिवासीमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले. तसेच आयोजक संस्थेबाबत झालेल्या तक्रारींबाबत आमदारांची बैठक घेऊन त्यानंतरच उर्वरित निधी दिला जाईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.  कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ५ टक्के खर्च अपंगासाठी खर्च करण्याबाबत अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. गाळेवाटपातही अपंगांना ५ टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणीही कडू यांनी केली होती. या संदर्भात बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा पणनमंत्री राम शिंदे यांनी विधानसभेत केली. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com