सोलापूर जिल्ह्यात जनावरांमध्ये ‘लंम्पी स्कीन'ची लक्षणे

सोलापूर ः जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि मोहोळ तालुक्यातील काही गावांमधील जनावरांच्यामध्ये या आजाराचा प्रसार झाल्याचे दिसून आले आहे.
Symptoms of 'Lumpy Skin' in animals in Solapur district
Symptoms of 'Lumpy Skin' in animals in Solapur district

सोलापूर  ः राज्यात काही भागात सध्या जनावरांमध्ये ‘लंम्पी स्कीन' या  विषाणुजन्य आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. आता जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि मोहोळ तालुक्यातील काही गावांमधील जनावरांच्यामध्ये या आजाराचा प्रसार झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागातर्फे  उपाययोजना करण्यास सुरवात करण्यात आली आहे.  

दक्षिण सोलापुरातील भंडारकवठे, वडापूर, आनंदनगर, कुसूर, तिऱ्हे (उत्तर सोलापूर) व मोहोळ परिसरातील काही भागात जनावरांना ‘लंम्पी स्कीन' आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. एप्रिल महिन्यात बीड, परभणी जिल्ह्यातील जनावरांच्यामध्ये याचा प्रादुर्भाव झाला होता. पण,  लसीकरणाची मोहीम राबवून तिथे हा आजार नियंत्रणात आणण्यात यश मिळाले. पण, आता हा आजार सोलापुरातही आला आहे. 

जनावरांना ताप येणे, त्यानंतर अंगावर गाठी येणे, रोग प्रतिकारशक्ती कमी होणे, रक्तमिश्रित पाणी वाहणे, अशी काही लक्षणे जनावरांच्यामध्ये दिसत आहेत. या आजारासाठी स्वतंत्र लस उपलब्ध नाही. पण, ताप कमी करण्याचे औषध, जीवनसत्वे, प्रतिकारशक्ती वाढण्याच्या औषधाने आजार कमी होतो, असे पशुसंवर्धन विभागातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग योग्य ती खबरदारी घेत आहे. घरगुती कोणतेही उपचार करु नका, थेट पशू दवाखान्यात जनावरांवर उपचार करावे. आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून तातडीने अलग करावे आणि उपचार सुरू करावेत, अशा सूचना पशुसंवर्धन विभागाने दिल्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com