उसाच्या थकीत बिलासाठी तासगावात आंदोलन

थकीत ऊसबिल मिळावे यासाठी खासदार संजय पाटील यांच्या बंगल्यावर शुक्रवारी (ता. २१) तासगाव येथे मोर्चा काढला. शेतकरी, संघटना आणि पोलिसांत झटापट झाली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
उसाच्या थकीत बिलासाठी तासगावात आंदोलन
Tasgaon agitation for sugarcane bill

सांगली ः तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकीत ऊसबिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी यांनी थकीत ऊसबिल मिळावे यासाठी खासदार संजय पाटील यांच्या बंगल्यावर शुक्रवारी (ता. २१) तासगाव येथे मोर्चा काढला. शेतकरी, संघटना आणि पोलिसांत झटापट झाली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  

दरम्यान, खासदार संजय पाटील यांनी ५ फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यावर बिले वर्ग करतो सांगितले. मात्र शेतकऱ्यांना ते मान्य केले नाही. शेतकरी आणि संघटनेने मोर्चा थेट तहसील कार्यालयावर नेला. आता २८५० रुपये घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा पवित्रा संघटना आणि शेतकऱ्यांनी घेतला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा तासगाव येथे काढण्यात आला. शिवाजी महाराजांना वंदन करून तो मोर्चा विटा नाका येथे आला. चिंचणी रोड येथे पोलिसांनी तो मोर्चा रोखला. आंदोलनस्थळी शेतकरी संतप्त झाले. दरम्यान आंदोलनकर्ते आणि पोलिस यांच्यात झटापटदेखील झाली. त्यामुळे तणावाचे वातावरण झाले. आंदोलनामुळे सुमारे ३० कोटींची ऊसबिले मिळवून देण्यात आली आहेत. अद्यापही काही शेतकऱ्यांची ऊस बिले थकीत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.