तापमानात वाढ, गारठा होतोय कमी 

राज्यात अशंतः ढगाळ हवामान असले तरी, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढू लागला आहे. यातच किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने थंडी कमी झाली आहे.
तापमानात वाढ, गारठा होतोय कमी 
temperature rise

पुणे : राज्यात अशंतः ढगाळ हवामान असले तरी, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढू लागला आहे. यातच किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने थंडी कमी झाली आहे. आज (ता.१८) राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  सोमवारी (ता.१७) उत्तर प्रदेशातील फुरसतगंड येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अनेक भागात दिवसाही गारठा वाढला असून, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार या राज्यांमध्ये आज थंड दिवस अनुभवायला मिळणार आहे.    महाराष्ट्राच्या किमान तापमानात वाढ झाली असून, धुकेही कायम आहे. यातच दुपारच्या वेळी राज्याच्या बहुतांशी भागात ढगाळ हवामान होत असून, राज्याच्या कमाल तापमानाचा पाराही वर जाऊ लागला आहे. सोमवारी (ता. १७)  जिल्ह्यात अंशतः ढगाळ हवामान होते. धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी ७.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोलापूर, आणि सांताक्रूज येथेही तापमानाचा पारा तिशीपार गेला आहे. 

रविवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअ समध्ये) :  पुणे २६.५ (१४.५), नगर - (११.०),  धुळे २७.० (७.५), जळगाव २७.२ (१३.५), कोल्हापूर २७.६ (१९.०), महाबळेश्वर २२.९(१३.९), मालेगाव - (१२.४), नाशिक २३.६ (१४.३), निफाड २२.५ (१०.०), सांगली २९.२ (१८.३), सातारा २६.०(१६.०), सोलापूर ३१.६ (१५.५), सांताक्रूझ ३२.५(२१.८), अलिबाग - (१९.५), डहाणू २९.३ (१८.०), रत्नागिरी ३१.५ (२१.४), औरंगाबाद २५.० (१२.५), नांदेड २७.२ (१५.२), उस्मानाबाद - (१४.२), परभणी २२.९ (१३.४), अकोला २७.४ (१५.५), अमरावती २७.४ (१४.१), बुलडाणा २५.४ (१३.४), ब्रह्मपुरी २८.० (१३.९), चंद्रपूर २६.६ (१४.४), गडचिरोली २६.४(१२.०), गोंदिया २५.० (११.०), नागपूर २५.६ (१२.४), वर्धा २६.०(१३.५), वाशीम २५.० (१२.०), यवतमाळ २६.० (१४.०).   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com