तापमानात चढ-उतार सुरूच 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडी, धुके आणि दिवसभर ढगाळ हवामान, असे वातावरण अनुभवायला मिळत आहे. विदर्भात पावसाच्या सरी सुरूच आहेत.
 तापमानात चढ-उतार सुरूच 
Temperatures continue to fluctuate

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडी, धुके आणि दिवसभर ढगाळ हवामान, असे वातावरण अनुभवायला मिळत आहे. विदर्भात पावसाच्या सरी सुरूच आहेत. आज (ता.१६) राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.    

राजस्थानमध्ये थंडीची लाट असून, उत्तर भारतातील राज्यात गारठा आणि धुके कायम आहे. शनिवारी (ता. १५) राजस्थानमधील सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी २.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर महाराष्ट्राच्या किमान तापमानात चढ-उतार होत असून, अनेक ठिकाणी पहाटे दाट धुके, तर दुपारी ढगाळ हवामान होत आहे.  शनिवारी (ता.१५) धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी ७.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे उच्चांकी २८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आजपासून (ता.१५) किमान तापमानात दोन ते चार अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

शनिवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे २७.१ (१३.३), नगर - (१२.४),  धुळे २५ (७.६), जळगाव २५.९ (१४), कोल्हापूर २५.७ (१५.९), महाबळेश्‍वर १८.२(११.८), मालेगाव २३ (१२.४), नाशिक २५.८ (१२.६), निफाड २५.२ (९), सांगली २६.६ (१३.७), सातारा २४.१ (१३.६), सोलापूर २८.८ (१५), सांताक्रूझ २७.९ (१८.६), अलिबाग २७.३ (-), डहाणू २५.६ (१६.२), रत्नागिरी २८.२ (१८.१), औरंगाबाद २५.४ (१३), नांदेड २४.६ (१७.८), उस्मानाबाद २६.२ (१५.४), परभणी २५.९ (१६.१), अकोला २०.९ (१४.१), अमरावती २१.२ (१३.९), बुलडाणा २२ (१४), ब्रह्मपुरी २५.१ (१६.९), चंद्रपूर २६.६ (१६.८), गडचिरोली २५.४ (१३.८), गोंदिया २०.८ (१२.५), नागपूर २१.२ (१५), वर्धा २२.५ (१५.२), वाशीम २५ (१२), यवतमाळ २४.५ (१४.५). 

  चंद्रपूर, गडचिरोलीत पाऊस सुरूच  पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत पाऊस सुरूच असून, शनिवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांसह पावसाने हजेरी लावली. गोंडपिपरी, एटापल्ली, मुलचेरा, सिंदेवाही, चंद्रपूर येथे प्रत्येकी २० मिलिमीटर, तर सिरोंचा, गडचिरोली, चामोर्शी येथे प्रत्येकी १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.