एक हजार शेतकऱ्यांकडून  ८८.५३ टन रेशीम कोष खरेदी 

​ परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील रेशीम कोष खरेदी मार्केटमध्ये १ एप्रिल २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत एक हजार शेतकऱ्यांच्या ८८.५३ टन रेशीम कोषाची खरेदी झाली.
From a thousand farmers Purchase of 88.53 Ton Silk Fund
From a thousand farmers Purchase of 88.53 Ton Silk Fund

परभणी ः जिल्ह्यातील पूर्णा येथील रेशीम कोष खरेदी मार्केटमध्ये १ एप्रिल २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत एक हजार शेतकऱ्यांच्या ८८.५३ टन रेशीम कोषाची खरेदी झाली. शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या रेशीम कोषाची किंमत ३ कोटी २६ लाख ३९ हजार २९० रुपये इतकी आहे, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम यांनी दिली. 

परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत रेशीम शेतीचा विस्तार झाला आहे. पूर्वी या भागातील शेतकऱ्यांना रामनगरम (बंगळूर) येथील रेशीम कोष विक्रीसाठी न्यावे लागत असत. त्यासाठी वाहतूक खर्च तसेच वेळ लागत असे. दोन वर्षांपूर्वी पूर्णा येथे रेशीम कोष खरेदी मार्केट सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची सोय झाली आहे. चालू आर्थिक वर्षात (२०२१-२०२२) १ एप्रिल ते ३१ डिसेंबरपर्यंत ३ खरेदीदार व्यापाऱ्यांनी १ हजार शेतकऱ्यांच्या ८८५३०.८२० किलो (८८.५३ टन) रेशीम कोषाची खरेदी केली आहे. 

दरम्यान, पूर्णा येथील समर्थ रेशीम कोष मार्केटमध्ये मंगळवारी (ता.११) रेशीम कोषाची ४७५ किलो आवक होती. रेशीम कोषास प्रति किलो किमान ४७५ ते कमाल ५६५ रुपये, तर सरासरी दर मिळाले. सोमवारी (ता.१०) रेशीम कोषाची ७५० किलो आवक असताना प्रति किलो किमान ४०० ते कमाल ५८० रुपये तर सरासरी दर मिळाले.२९ डिसेंबर २०२१ ते ५ जानेवारी २०२२ पर्यंत रेशीम कोषाचे दर प्रति किलो ७०० ते ८०० रुपये होते. मकर संक्रातीच्या काळात सौदे कमी असतात तसेच तसेच कोरोनाच्या निर्बंधामुळे दर कमी झाले आहेत. पुढील महिन्यात दरामध्ये सुधारणा होऊ शकते, असे मार्केटमधील सूत्रांनी सांगितले.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com