आरग परिसरात तिनशे एकर ऊस आडवा

आरग, जि. सांगली : आरग परिसरात गेल्या तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने ३०० एकरहून अधिक ऊस भुईसपाट झाला आहे.
Three hundred acres of sugarcane is destroyed in Arag area
Three hundred acres of sugarcane is destroyed in Arag area

आरग, जि. सांगली :  आरग परिसरात गेल्या तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने ३०० एकरहून अधिक ऊस भुईसपाट झाला आहे. ऐन गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसाने धुडगुस घातला. त्यामुळे ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे. परिणामी, तातडीने पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

लिंगनुर येथे वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडात जोरदार मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा सर्वाधिक फटका ऊस पिकाला बसला. येथील हरिदास सोनुरे यांचा पाच एकर ऊस कोसळला आहे. अचानक पडलेल्या या पावसाने कुरणे वस्ती, सोनुरे, कुडचे, मगदूम वाडी व खटाव परिसरात अख्या उसाचे फडच भुईसपाट झाले आहेत. येथे उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, हुमनी व लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव उसावर झाला आहे.  

दरम्यान, परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे ऊस पिकासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे महसूल, पंचायत, कृषी विभागाने बांधावर जाऊन पंचनामा करण्याची मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी केली.

शेतकऱ्यांवर संकटाची मालिका  

ऊस उत्पादक शेतकऱ्यावर यावर्षी संकटाची मालिका सुरू आहे. सुरुवातीला पावसाने दांडी मारली. कोरोना व लॉकडाऊन मुळे अन्य पिकांची मागणी घटली व आर्थिक फटका बसला. आता त्यातच वादळी वाऱ्याने पुन्हा ऊस भुईसपाट झाला. 

वादळी वाऱ्यासह पावसाने पाच एकरांवरील पीक भुईसपाट झाले. मोठे नुकसान झाले असून मदतीची गरज आहे. शासनाने बांधावर येऊन पंचनामा करावा व नुकसान भरपाई द्यावी. - हरिदास सोनुरे, लिंगनूर, ता. मिरज.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com