सातारा जिल्ह्यात गाळप हंगाम लांबणार

जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांनी ९० लाख ५३ हजार ६८३ मेट्रिक टन उसाचे गाळप करून एक कोटी एक लाख पाच हजार ७९६ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.
सातारा जिल्ह्यात गाळप हंगाम लांबणार
The threshing season will be extended in Satara district

सातारा : जिल्ह्यातील ऊस तोडणीसाठी अद्याप मोठ्या प्रमाणात शिल्लक असल्याने हा ऊस गाळप हंगाम लांबणार आहे. आगामी वर्षभरात अनेक कारखान्यांच्या निवडणुका असल्याने आपापल्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊस तोडणीवर भर दिला आहे. जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांनी ९० लाख ५३ हजार ६८३ मेट्रिक टन उसाचे गाळप करून एक कोटी एक लाख पाच हजार ७९६ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.  

जिल्ह्यातील ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी अद्याप मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात हार्वेस्टर मशिनच्या साहाय्याने उसाची तोडणी सुरू केली आहे. यावर्षी खासगी साखर कारखान्यांनी मिळून विक्रमी साखर निर्मिती केली आहे. सहकारी साखर कारखान्यांचे गाळप धिम्या गतीने सुरू आहे. दोन साखर कारखाने वगळता उर्वरित १४ साखर कारखान्यांनी गाळप केले आहे. साडेचार ते पाच महिने हंगाम सुरू आहे. यावर्षी प्रत्येक कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस असल्याने उसाची पळवापळवी झालेली नाही. मात्र, शेतकऱ्यांपुढे उसाला चांगला दर देणाऱ्या कारखान्यांचा ऑप्शन राहिला आहे. यावर्षी बहुतांशी कारखान्यांच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे कार्यक्षेत्रातील सर्व ऊस तोडण्यावर भर दिला आहे.

जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांनी ९० लाख ५३ हजार ६८३ मेट्रिक टन उसाचे गाळप करून एक कोटी एक लाख पाच हजार ७९६ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. ऊस परिपक्व होण्याचे प्रमाण वाढले असल्याने साखर उताऱ्यात सुधारणा झाली असून सध्या सरासरी ११.१६ टक्के साखर उतारा मिळत आहे. गाळप व साखर निर्मितीत जरंडेश्‍वर कारखान्याने आघाडी कायम असून, आतापर्यंत १२ लाख ९५ हजार ६४० मेट्रिक टन उसाचे गाळप करून १४ लाख ७० हजार ८०० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. तर साखर उताऱ्यात सह्याद्री कारखान्याची आघाडी कायम आहे.

लवकर तोडणीसाठी पैसे देणे हाच पर्याय सध्या ऊस तोडणीसाठी टोळींकडून एकरी चार ते पाच हजारांची मागणी होत आहे. शेतकऱ्यांची गरज बघून पैसे काढण्याचे प्रकार सुरू आहे. बिगर नोंदणीच्या उसाला जास्त मागणी होत आहे. त्यातच सध्या पाणी टंचाई भासू लागल्याने ऊस लवकर तुटावा म्हणून शेतकऱ्यांना पैसे दिल्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com