`किसान रेल्वे’च्या पहिल्या फेरीद्वारे ७० टन शेतमालाची वाहतूक

सोलापूरः सोलापूर विभागातून सुरु झालेल्या किसान रेल्वेची पहिल्या फेरीची रेल्वे शुक्रवारी (ता.२१) नाशिककडे रवाना झाली. पुढे ही रेल्वे दानापूरकडे (बिहार) जाणाऱ्या किसान रेल्वेला जोडली जाणार आहे. सोलापूर विभागातून या रेल्वेसाठी सुमारे ७० टन शेतमालाची वाहतूक झाली.
 Through the first round of Kisan Railway Transport of 70 tons of agricultural produce
Through the first round of Kisan Railway Transport of 70 tons of agricultural produce

सोलापूर ः सोलापूर विभागातून सुरु झालेल्या किसान रेल्वेची पहिल्या फेरीची रेल्वे शुक्रवारी (ता.२१) नाशिककडे रवाना झाली. पुढे ही रेल्वे दानापूरकडे (बिहार) जाणाऱ्या किसान रेल्वेला जोडली जाणार आहे. सोलापूर विभागातून या रेल्वेसाठी सुमारे ७० टन शेतमालाची वाहतूक झाली. 

विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता आणि अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक व्ही. के. नागर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ मंडल वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे या अधिकाऱ्यांनी  यासाठी विशेष प्रयत्न केले. सोलापूर विभागाच्या इतिहासात प्रथमच किसान रेल्वे (कोल्हापूर ते मुजफ्फरपूर) धावणार आहे. सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, बेलवंडी, अहमदनगर आणि बेलापूर स्थानकावरून पार्सल लोडिंग करत ही रेल्वे पुढे रवाना झाली.

या लोडिंगमध्ये सोलापूर विभागातून डाळिंब, शिमला मिरची, सीताफळ, नारळाची रोपे, लिंबू हे शेतमाला पाठवण्यात आले. सुमारे ७० टनाचेपर्यंतचे लोडिंग या गाडीतून झाले. यातून रेल्वेला एकूण ३ लाख ३२ हजार ५४० रुपयांचे उत्पन्न मिळाले.

या रेल्वेमुळे सोलापुर विभागातील शेतकऱ्यांचा नाशवंत माल कमी दरात, अतिजलद आणि सुरक्षित जाऊ शकणार आहे. शिवाय वाहतूक खर्चही आवाक्‍यात आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन रेल्वेच्या प्रशासन विभागाने केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com