द्राक्ष विम्यासाठी आज अंतिम मुदत

राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेअंतर्गत आंबिया बहार सन २०२०-२१ मध्ये द्राक्ष पिकासाठी अवेळी पाऊस, दैनंदिन कमी तापमान,गारपीट या समाविष्ट धोक्यांसाठी विमा संरक्षण कालावधी हा १६ ऑक्टोंबर ते ३१ मार्च २०२१ अटी, शर्ती व अधिसूचित फळपिकाच्या हवामान धोके निकर्षानुसार राबविण्यात येत आहे.
Today is the deadline for grape insurance
Today is the deadline for grape insurance

नाशिक : राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेअंतर्गत आंबिया बहार सन २०२०-२१ मध्ये द्राक्ष पिकासाठी अवेळी पाऊस, दैनंदिन कमी तापमान,गारपीट या समाविष्ट धोक्यांसाठी विमा संरक्षण कालावधी हा १६ ऑक्टोंबर ते ३१ मार्च २०२१ अटी, शर्ती व अधिसूचित फळपिकाच्या हवामान धोके निकर्षानुसार राबविण्यात येत आहे. द्राक्ष पिकासाठी योजनेत सहभागी होण्याची मुदत आज (ता.१५) असून अधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील पिकासाठी लाभ घेणे ऐच्छिक असून, द्राक्ष फळपिकाचे उत्पादनक्षम वय २ वर्षे व त्यापेक्षा जास्त फळबागांना विमा संरक्षण कवच लागू राहणार आहे. जमीन भुधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. अधिसूचित क्षेत्रात कुळाने, भाडे पट्टीत शेती करणाऱ्या शेतकऱ्यासह सर्व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेत भाग घेता येणार आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असेही कळविले आहे.

संभाव्य धोक्यानुसार पीकविमा हप्ता शेतकऱ्यांनी अवेळी पाऊस व कमी तापमान या संभाव्य धोक्यांसाठी भरावयाचा विमा हप्ता १६ हजार प्रति हेक्टरी तसेच व या कालावधीसाठी गारपीट या धोक्यासाठी  विमा रक्कम ५ हजार ३३३ रुपये प्रति हेक्टर अशी आहे. या पैकी दोन्ही बाबतीत शेतकऱ्यांनी भरावयाची एकत्रित विमा रक्कम २१ हजार ३३३ रुपये प्रतिहेक्टर अशी आहे.

हवामान धोके विमा संरक्षण कालावधी
अवेळी पाऊस १६ ऑक्टोबर ते ३१ मार्च
कमी तापमान १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी
गारपीट १ जानेवारी ते ३० एप्रिल

फळपिकाच्या नोंदणीकरिता राष्ट्रीय पीक विमा पोर्टल सुरु करण्यात आलेले आहे.तरी शेतकऱ्यांनी द्राक्ष फळपिकाच्या हवामान धोक्याची माहिती करून घेऊन नजीकच्या ई-सेवा केंद्र,बॅक,वित्तीय संस्था यांचेशी संपर्क साधून  योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. - दिलीप देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी, मालेगाव

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com