तूर डाळ शंभरी गाठणार 

खरीप पिकांना अवेळी आलेल्या पावसाचा फटका बसल्याचा परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवरही होत आहेत. खरीप हंगामातील डाळवर्गीय पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले.
 तूर डाळ शंभरी गाठणार 
Toor Dr. Shambhari Gathanar

नागपूर ः खरीप पिकांना अवेळी आलेल्या पावसाचा फटका बसल्याचा परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवरही होत आहेत. खरीप हंगामातील डाळवर्गीय पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले. त्याचा परिणाम बाजारभावावर झाल्याचे दिसत आहे. यामुळे डाळीच्या दरात चढ-उतार कायम होता. यंदा पावसाचा फटका शेतातील तुरीच्या पिकांना बसल्याने तूर डाळीचे दर प्रति किलो शंभरावर जाण्याचे संकेत मिळत आहेत. 

खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. परंतु, यंदा अवेळी आलेल्या पावसामुळे शेतातील तुरीच्या पिकाला फटका बसत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन डाळ येण्यास अद्यापही दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. जुन्या डाळीची मागणी कमी झालेली असल्याने सध्या तूर डाळ ८८ ते ९२ रुपये प्रति किलोवर आहे. अमरावती, वाशीम, अकोला येथील दाळ मिलमध्ये तुरीची आवक येण्यात अजून १५ दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन आठवड्यांत तूर डाळीच्या दरात चढ उतार होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यानंतर मात्र, डाळीचे दर वाढण्याचे संकेत मिळत आहेत. नागपूर जिल्ह्यात आलेल्या पावसामुळे ४७५० हेक्टर रब्बी पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. अवकाळी पावसामुळे तूर, हरभरा, ज्वारीचे नुकसान झाले आहे. 

अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने भाव वाढ  हरभऱ्यामध्ये गेल्या आठवड्यात दिल्लीत किंचित वाढ झाली. मात्र, विदर्भात घट झाली. मूग मोगर, उडीद मोगर आणि मसूर डाळीच्या दरातही किंचित चढ-उतार झाला. राजस्थानमध्ये आलेल्या पावसामुळे ७० हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच छत्तीसगडमध्ये ३७ हजार २२ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. कर्नाटकातही आलेल्या पावसामुळे तुरीच्या पिकांची गुणवत्ता घसरली आहे. अद्यापही कर्नाटकातून तुरीची आवक सुरू न झाल्याने येत्या काही दिवसांत भाव वाढण्याचे संकेत दिले जात आहे, असेही नागपूर किरकोळ किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com