कृषी योजनांत नगर राज्यात आघाडीवर

नगर ः ‘‘कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा केली आहे. त्यामुळे कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी नगर जिल्हा आघाडीवर आहे. आतापर्यंत शेकडो शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ मिळाला आहे,’’ असे पालकमंत्री व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
कृषी योजनांत नगर राज्यात आघाडीवर
Town in agricultural plan Leading in the state

नगर ः ‘‘कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा केली आहे. त्यामुळे कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी नगर जिल्हा आघाडीवर आहे. आतापर्यंत शेकडो शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ मिळाला आहे,’’ असे पालकमंत्री व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. 

नगर येथे मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभ मुश्रीफ यांच्या हस्ते नूतन जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, महापालिका आयुक्त शंकर गोरे उपस्थित होते. 

मुश्रीफ म्हणाले, ‘‘जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन म्हणजेच स्मार्ट प्रकल्पात जिल्ह्यातील ६४ प्रकल्पांना मंजुरी मिळाली. यात राज्यात जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत १९३० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड केली. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत ६९६ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड केली. मागेल त्याला शेततळे योजनेत जिल्ह्यात १७ हजार शेततळी बांधली. एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यासाठी ५३ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.  कृषी सिंचन योजनेअंतर्गत आतापर्यंत ६६ हजाराहून अधिक शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचनाचा लाभ दिला.’’ 

‘‘जिल्‍ह्यात एकूण ३९ लाखाहून अधिक कोरोना चाचण्या केल्या. २७ पीएसए प्‍लांट कार्यान्वित झाले आहेत. १६ एलएमओ प्‍लांट सुरू झाले. २२८ मेट्रिक्‍स टन ऑक्सिजनची निर्मिती यातून होणार आहे. दुसऱ्या लाटेत दैनंदिन रुग्णसंख्येसाठी आवश्यक ऑक्सिजनपेक्षा तिप्पट व्यवस्था उभी करीत आहोत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोरोना उपाययोजनांच्या अनुषंगाने १०७ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली. आमदार स्‍थानिक विकास कार्यक्रमातून १४ कोटींचे कामे मंजूर करण्‍यात आली. जिल्‍ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली आहे,’’ असेही मुश्रीफ म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.