ट्रॅक्टरमुळे बचत गटांचे उत्पन्न वाढेल ः शंभूराज देसाई

मानव विकास कार्यक्रमांतर्गत लोकसंचालित साधन केंद्रांना ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारे उपलब्ध करून दिल्यामुळे महिला बचत गटांच्या आर्थिक उत्पन्न वाढीस चालना मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
ट्रॅक्टरमुळे बचत गटांचे उत्पन्न वाढेल ः शंभूराज देसाई
ट्रॅक्टरमुळे बचत गटांचे उत्पन्न वाढेल ः शंभूराज देसाई

वाशीम : महिला बचत गटांच्या माध्यमातून गाव-खेड्यांतील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे आवश्यक आहे. याकरिता महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत प्रयत्न केले जात आहेत. मानव विकास कार्यक्रमांतर्गत लोकसंचालित साधन केंद्रांना ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारे उपलब्ध करून दिल्यामुळे महिला बचत गटांच्या आर्थिक उत्पन्न वाढीस चालना मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

मानव विकास कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ६ लोकसंचालित साधन केंद्रांना ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारांचे ऑनलाइन वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार भावना गवळी, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, मानव विकास कार्यक्रमाचे जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सोनखासकर, महिला आर्थिक महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांच्यासह लोकसंचालित साधन केंद्र व बचत गटांच्या अध्यक्ष, सदस्य या कार्यक्रमात दुदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

या वेळी वाशीम, रिसोड, मालेगाव तालुक्यांतील ६ लोकसंचालित साधन केंद्रांना प्रत्येकी १ ट्रॅक्टरसह ट्रॉली, रोटावेटर, पेरणीयंत्र, नांगर, पंजी, थ्रेशर, फवारणीयंत्र व नऊ फाळी आदी साहित्यांचे ऑनलाइन वितरण करण्यात आले. खासदार गवळी म्हणाल्या, की बचत गटांच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्यास जिल्ह्याच्या विकासाला त्याचा मोठा हातभार लागेल. त्यामुळे महिला आर्थिक विकास महामंडळाने जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांचे आर्थिक उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करावेत.

‘माविम’च्या अध्यक्ष श्रीमती ठाकरे म्हणाल्या, की राज्यात पहिले ‘रूरल मार्ट’ सुरू करून बचत गटांच्या महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा उपक्रम वाशीम येथे राबविण्यात आला आहे.

श्री. नागपुरे म्हणाले, की लोकसंचालित साधन केंद्र हे बचत गटांचे फेडरेशन म्हणून काम करते. या केंद्राद्वारे महिला बचत गटांना हे ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारे अत्यल्प दराने भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागठाणा येथील महिला बचत गटाच्या अध्यक्ष श्रीमती नंदा बायस यांनीही या वेळी आपले मनोगत व्यक्त केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com