आधुनिक काळातही मुलीचा वाणवसा बैलगाडीतून...

सजविलेले बैल, घुंगराची रंगीत गाडी आणि आपल्या लाडक्या मुलीला ऐटीत सासरी वाणवसा (वेगवेगळ्या पदार्थांनी भरलेल्या करंड्या) पोचवायला निघालेला पिता, असे दृश्‍य वेगाच्या युगात दुर्मीळ होत चालले आहे.
काशीळ (ता. सातारा) येथील माने कुटुंबीयांकडून पारंपरिक पद्धतीत मुलगी व वसा बैलगाडीतून पाठवताना कुटुंबातील सदस्य. 
काशीळ (ता. सातारा) येथील माने कुटुंबीयांकडून पारंपरिक पद्धतीत मुलगी व वसा बैलगाडीतून पाठवताना कुटुंबातील सदस्य. 

सातारा : सजविलेले बैल, घुंगराची रंगीत गाडी आणि आपल्या लाडक्या मुलीला ऐटीत सासरी वाणवसा (वेगवेगळ्या पदार्थांनी भरलेल्या करंड्या) पोचवायला निघालेला पिता, असे दृश्‍य वेगाच्या युगात दुर्मीळ होत चालले आहे. मात्र काशीळ (ता. सातारा) येथील माने कुटुंबीयांनी नुकतेच आपल्या मुलीला बैलगाडीतून सासरी पोहोचवत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

हिंदू धर्मात लग्नानंतर पहिल्या संक्रांतीस सासरहून माहेरला वाणवसा नेला जातो व सक्रांत झाल्यानंतर मुलीच्या माहेरातून वाणवसा घेऊन सासरी सोडण्याची पद्धत आहे. काळाबरोबर या पद्धतीत बदल होत गेला आहे. सध्या युगात चारचाकी गाडीतून वाणवसा आणला नेला जातो. मात्र या पद्धतीला माने कुटुंबीयांनी फाटा दिला आहे. येथील तुकाराम गोविंद माने यांचे पाच भावांचे शेतकरी कुटुंब आहे. बागायत भागात बैलाचे संगोपन हाताच्या बोटांवर मोजण्याइतके शेतकरी करत असले तरी या कुटुंबाचा मुख्य आधार शेती असल्याने घरी बैलजोडीचे संगोपन केले जाते.

या कुटुंबातील तुकाराम माने यांची पुतणी व सुनील माने यांची मुलगी शिवानी हिला अतित या सासरमधून संक्रांतीसाठी आणले होते. सक्रांत झाल्यावर मुली सासरी पाठविण्यासाठी त्यांनी नव्या पद्धतीत बदल करत पारंपरिक पद्धतीचा अवलंब केला आहे. स्वता:कडे असलेली बैलांची जोडी बेंदूर सणाप्रमाणे घुंगरू, रंगरंगोटी व सजावट केली. तुकाराम माने यांनीही फेटा बांधून हा वाणवसा व आपल्या मुलीला बैलगाडीतून घेऊन गेले. हा अतितचा पाच किलोमीटर प्रवास त्यांनी मुलीला घेऊन केला आहे. त्यांनी आधुनिक युगातही पारंपरिक पद्धतीने मुलीला सासरी पाठवत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com