तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस !!!

कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात राज्यात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस !!!
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस !!!

कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात राज्यात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यापूर्वी २६ जुलै २००५ मध्ये मुंबईत ९४४.२ मिलिमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली होती. त्यानंतर शुक्रवारी तुळशी धरण परिसरात पडलेला पाऊस हा उच्चांकी मानला जात आहे.  

तुफान पावसाने जलाशयात ०.६ टीएमसी पाण्याची वाढ झाली. सध्या जलाशय ८५ टक्के भरले आहे. ढगफुटीने या भागात भूसख्लन ही झाले. २०१९ ला २४ तासात ४३६ मिलिमीटर पावसाचा विक्रम होता त्याच्या दुप्पट पाऊस झाला आहे. जिल्ह्यात हा विक्रम असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता रोहित बांदिवडेकर यानी दिली. 

जिवघेणा पाऊस काय असतो याचा अनुभव धामोडसह तुळशी परिसराने घेतला. तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे गुरुवारी (ता.२२) सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या बारा तासात ४०० मी.मी. उच्चांकी पावसाची नोंद झाली. सकाळी सहा ते सायंकाळी चार पर्यंत २९२ मीमी पाऊस नोंदला होता. त्यानंतरच्या दोन तासात म्हणजे सहापर्यंत १०८ मिलिमीटर असा बारा तासात पावसाने विक्रम केला आहे. 

धरणात सुमारे ४४०० क्‍युसेकने पाण्याची आवक होत असल्याने पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. परिसरात मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. शुक्रवार अखेर २१२७  मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. केळोशी येथील लोंढा नाला प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून सुमारे १५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग धरण क्षेत्रात येत आहे. यापूर्वी ५ ऑगस्ट २०१९ साली येथे झालेल्या १२ तासातील ३३८ मि.मी. पावसाची नोंद उच्चांकी होती. आजच्या पावसाने १२ तासात ४०० मि.मी. पावसाची विक्रमी नोंद केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com