तूर खरेदी नोंदणीस १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

तूर खरेदी नोंदणीस १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
तूर खरेदी नोंदणीस १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

पुणे : राज्यात सुरू असलेल्या शासकीय तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना दिलेली नोंदणीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. सहकारी पणन महासंघघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ तसेच महाएफपीसीकडे तूर खरेदीची जबाबदारी देण्यात आली आहे. शासनाने तुरीला हमीभाव ५८०० रुपये प्रति क्विंटल दिला आहे. बाजारात सध्या दर ४७०० ते ५१०० रुपये  असल्याने सरकारी हमीभाव खरेदी केंद्रांचा शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार आहे. तूर उत्पादकांना नोंदणीसाठी एक जानेवारीपासून ऑनलाइन सुविधा देण्यात आली. आता ही नोंदणी १५ एप्रिलपर्यंत सुरू राहील.  दरम्यान, तूर खरेदी एक फेब्रुवारीपासून सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्यात ३४ हजार शेतकऱ्यांनी ३ लाख २५ हजार क्विंटल तूर विकली आहे. राज्यात सध्या ३२५ केंद्रे उघडण्यात आली आहे. ‘एफसीआय’ने उशिरा केंद्रे उघडल्यामुळे नोंदणी कालावधी वाढविण्यात आला, अशी माहिती महासंघाच्या मुख्यालयातून देण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com