तुरीच्या दरात काहीशी सुधारणा 

आठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती. तसेच उठाव राहिल्याने दरात १०० ते १५० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. कर्नाटकात स्टॉकिस्ट आणि प्लांट्सची खरेदी वाढल्याने दर काहीसे वाढले होते.
 तुरीच्या दरात काहीशी सुधारणा 
Turichiya Darat Kahishi Reform

पुणे ः आठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती. तसेच उठाव राहिल्याने दरात १०० ते १५० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. कर्नाटकात स्टॉकिस्ट आणि प्लांट्सची खरेदी वाढल्याने दर काहीसे वाढले होते. तर महाराष्ट्रात दर काहीसे सुधारले होते. मागील आठवड्यात तुरीचे दर ५ हजार ७०० ते ६ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान राहिले. 

देशातील तूर आवकेचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र सध्या बहुतेक बाजारात तुरीचे दर हमीभावापेक्षा कमीच असल्याची स्थिती आहे. तूर उत्पादनात कर्नाटक आणि महाराष्ट्र ही महत्त्वाची दोन राज्ये आहेत. महाराष्ट्रातील काही भागांत पाऊस झाला. त्यानंतर वातावरणात ओलावा होता. त्यामुळे तूर काढणीमध्ये अडचणी आल्या. त्यामुळे राज्य पातळीवर तूर आवक मंदावली होती. तूर आवकेचा हंगाम अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. मात्र अशी स्थिती असूनही विक्रमी आयात आणि शिल्लक साठ्यामुळे तुरीचे दर दबावात आहेत. मागील आठवड्यात तुरीची मागणी सामान्य राहिली. त्यामुळे तुरीच्या दरात काहीशी तेजी-मंदी राहिली. बाजारात आवक होणाऱ्या नवीन तुरीमध्ये ओलावा अधिक आहे, असे नांदेड येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.  सरकारची हमीभावाने तूर खरेदीची प्रक्रिया सुरू झाली असली तरी ओलावा अधिक असल्याने शेतकरी खुल्या बाजारात सध्या माल विकत आहेत. महाराष्ट्रात मागील आठवड्यात वातावरण आणि सणामुळे तूर आवक कमी होती. तसेच या काळात तुरीच्या दरात सरासरी १०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. मागील आठवड्यात महाराष्ट्रात जुन्या तुरीला ६ हजार ५० ते ६ हजार ४०० रुपयांपर्यंत दर मिळाला. तर नवीन तुरीला सरासरी ५ हजार ९०० ते ६ हजार ३०० रुपये दर मिळाला. 

कर्नाटकात मागील आठवड्यात तुरीला काहीशी मागणी राहीली. स्टॉकिस्ट आणि मिल्स खरेदीत उतरल्या होत्या. त्यामुळे कर्नाटकात मागील आठवड्यात तुरीच्या दरता काहीशी सुधारणा झाली होता. बीदर येथे मागील सप्ताहात तुरीच्या दरात २५० रुपयांची सुधारणा झाली होती. तर यादगीर आणि गुलबर्गा येथील बाजार समितीत दर ५० ते १०० रुपयांनी वाढले होते. मागील आठवड्यात कर्नाटकात तुरीचे दर ५ हजार ७०० ते ६ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान राहिले. 

डाळीच्या दरातही सुधारणा  तूर डाळीचा विचार करता आठवड्यात १५० ते २५० रुपयाने दरात सुधारणा झाली होती. मागील आठवड्यात तुरीला मागणी राहिल्याने दरात सुधारणा झाली होती. दिल्ली येथील बाजारात डाळीचे दर ८ हजार ७५० ते ९ हजार २०० रुपये प्रति क्विंटल राहिले. तर अकोला येथे ८ हजार ते ९ हजार रुपये, गुलबर्गा येथे ९ हजार १०० ते ९ हजार ४०० रुपये आणि इंदोर येथे ८ हजार ९०० ते ९ हजार ३०० रुपये प्रति क्विंटलने डाळीचे व्यवहार झाले.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.